Ajit Pawar | दादा भुसेंना कांद्यावर बोलायची गरज नव्हती; अजित पवारांचा शिंदे गटावर हल्लाबोल

Ajit Pawar | मुंबई: कांद्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारने 40 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.

अशात मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. कांदा खाणं परवडत नसेल तर दोन-तीन महिने कांदा खाऊ नका, असं दादा भुसे यांनी म्हटलं होतं.

दादा भुसे यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दादा भुसे यांना कांद्यावर बोलण्याची गरज नव्हती असं म्हणत अजित पवारांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “परवडत नसेल तर कांदा खाऊ नका, असं दादा भुसे यांना बोलायची गरज नव्हती, असं आम्ही सांगू.”

अजित पवारांची ही प्रतिक्रिया ऐकून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवारांच्या या प्रतिक्रियेनंतर दादा गट आणि शिंदे गटात नवीन वाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Onion is the food of the poor people – Sanjay Raut

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील दादा भुसे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “कांदा खाऊ नका म्हणणारे मंत्री दीडशहाणे आहे.

एखादी गोष्ट जर मिळत नसेल तर ती खाऊ नका असं जर सरकारचं म्हणणं असेल, तर सरकार म्हणून तुमचा काय उपयोग आहे? कांदा हे गरिबांचं खाणं आहे श्रीमंताचं नाही.

सामान्य माणसानं कांदा भाकरी खायची नाही का? आम्ही जनतेला काहीही बोलू शकतो, काहीही सल्ले देऊ शकतो, हा या सरकारचा मस्तवालपणा आहे आणि ही सर्व परिस्थिती खोक्यातून निर्माण झाली आहे. मात्र, एखादी गोष्ट मिळत नसेल तर ती उपलब्ध करून देण्याचं काम सरकारचं आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.