Ramdas Athawale | मी आठवले ऐवजी आंबेडकर झालो असतो; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

Ramdas Athawale | यवतमाळ: कांद्याच्या मुद्द्यावरून राज्याचं राजकारण तापलेलं असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे.

माईसाहेब आंबेडकर मला दत्तक घेण्याची शक्यता होती. त्यानंतर मी आठवले ऐवजी आंबेडकर झालो असतो, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. रामदास आठवले यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे.

I respect Prakash Ambedkar – Ramdas Athawale

माध्यमांशी बातचीत करत असताना रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नातू होण्याची संधी मला मिळाली नाही.

माईसाहेब आंबेडकर मला दत्तक घेण्याची शक्यता होती. त्यांनी जर मला दत्तक घेतलं असतं तर मी रामदास आठवले ऐवजी रामदास आंबेडकर झालो असतो. प्रकाश आंबेडकर हुशार आहेत. मात्र कोणत्या वेळी काय भूमिका घ्यावी, हे त्यांना कळायला हवं.”

यावेळी बोलत असताना रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आगामी लोकसभा निवडणुकांवर देखील भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये आम्हाला दोन जागा मिळाव्या यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

मी शिर्डीतून पराभूत झालो होतो. मात्र, आगामी निवडणुकांमध्ये मला शिर्डीतून लढण्याची संधी मिळाली तर मी नक्की लढेल. मी लोकसभेचा माणूस आहे.

तर माझी राज्यसभा कारकीर्द 2024 पर्यंत आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला दोन जागा देण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर आम्हाला कमळ चिन्ह दिलं होतं.

मात्र, यावेळी आम्ही कमळ चिन्हावर लढणार नाही. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आम्ही आमच्या चिन्हावरच लढवणार आहोत.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.