Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे दोन गट पडले. त्यानंतर शिवसेनेच्या बहुतांश कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला.
अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चिंतेत भर पडणारी माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचे काही नेते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.
Haridas Bhade will have a meeting with Uddhav Thackeray
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे.
अशात उद्धव ठाकरेंना सोडून गेलेले नेते पुन्हा एकदा ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) पुन्हा एकदा ठाकरे गटात प्रवेश करणार आहे.
वाकचौरे यांच्यासह नगर जिल्ह्यातील अनेक समर्थक ठाकरे गटात सहभागी होणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हरिदास भदे देखील ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हरिदास भदे यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर त्यांचा पक्ष प्रवेशाचा निर्णय होणार आहे.
दरम्यान, भाऊसाहेब वाकचौरे यांचा आज दुपारी 12 वाजता मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह श्रीरामपूरचे काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे यांचा देखील आज पक्षप्रवेश पार पडणार आहे.
या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटाची ताकद नक्कीच वाढणार आहे. तर दुसरीकडे या पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या चिंतेत भर पडणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ramdas Athawale | मी आठवले ऐवजी आंबेडकर झालो असतो; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
- Ajit Pawar | दादा भुसेंना कांद्यावर बोलायची गरज नव्हती; अजित पवारांचा शिंदे गटावर हल्लाबोल
- Ramdas Athawale | उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत यावं त्यांना आम्ही उपमुख्यमंत्री करू – रामदास आठवले
- Ajit Pawar | शरद पवारांच्या परवानगीशिवाय भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं
- Ajit Pawar | कांद्याच्या मुद्द्यावरून दादा गट आणि भाजप आमने-सामने; अजित पवार म्हणाले, “आम्हाला श्रेय…”