Ajit Pawar | बंडखोरीनंतर अजित दादा पहिल्यांदाच जाणार बारामतीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले. या घटनेनंतर अजित पवार पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात म्हणजेच बारामतीमध्ये जाणार आहे.

26 ऑगस्ट 2023 रोजी अजित पवार बारामतीमध्ये दाखल होणार आहे. यावेळी बारामती शहरामध्ये अजित पवारांची भव्य मिरवणूक काढली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Ajit Pawar will go to Baramati after two and a half months

राज्य सरकारमध्ये सामील होण्यापूर्वी अजित पवार (Ajit Pawar) दर शनिवारी विकास कामाचा आढावा घेण्यासाठी बारामतीला जात होते. मात्र, गेल्या अडीच महिन्यात अजित पवार बारामतीला गेले नाही.

अजित पवार अडीच महिन्यानंतर बारामतीत येणार असल्यामुळं त्यांच्या स्वागताची कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर बारामतीत त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.

या दौऱ्यादरम्यान अजित पवार यांच्या हस्ते बारामतीतील विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर अजित पवार एका कार्यक्रमात भाषण देखील करणार आहे.

आपल्या मतदारसंघात अजित पवार काय भूमिका मांडतील? याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, शरद पवारांच्या परवानगीशिवाय भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला का? या प्रश्नाचं उत्तर देत अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे. त्यामुळं आम्ही सर्वांनी बहुमतानं मिळून हा निर्णय घेतला.

शिवसेना आणि भाजप 25 वर्षापासून मित्रपक्ष होते. 2019 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतःचे विचार बाजूला ठेवून शिवसेनेसोबत युती केली. त्यामुळे आम्ही शरद पवारांपेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे, असं दाखवण्याचं काहीच कारण नाही.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.