Share

Rohit Pawar | जिथे भाजपचे विचार संपतात, तिथे पवार साहेबांचे सुरू होतात – रोहित पवार

Rohit Pawar | कोल्हापूर: 25 ऑगस्ट रोजी शरद पवारांची (Sharad Pawar) कोल्हापूर शहरामध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यांच्या या सभेपूर्वी रोहित पवार कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहे. कोल्हापूरमध्ये दाखल होताच रोहित पवारांनी माध्यमांशी बातचीत केली आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपचे विचार जिथे संपतात तिथे शरद पवारांचे विचार सुरू होतात, असं रोहित … Read more

Published On: 

Rohit Pawar | कोल्हापूर: 25 ऑगस्ट रोजी शरद पवारांची (Sharad Pawar) कोल्हापूर शहरामध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यांच्या या सभेपूर्वी रोहित पवार कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहे.

कोल्हापूरमध्ये दाखल होताच रोहित पवारांनी माध्यमांशी बातचीत केली आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपचे विचार जिथे संपतात तिथे शरद पवारांचे विचार सुरू होतात, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar targets BJP from the beginning – Rohit Pawar

रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “शरद पवारांचा राजकीय अनुभव 60 वर्षाचा आहे. जिथे भाजपचे राजकीय विचार संपतात तिथे शरद पवारांचे सुरू होतात.

भारतीय जनता पक्षानं पक्ष फोडला, कुटुंब फोडलं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट भांडत राहिले.

मात्र, या सगळ्यामध्ये भाजप बाजूला राहिला. या सर्व घटना जर भारतीय जनता पक्षामुळं घडल्या असतील तर त्याला टार्गेट करायला काय हरकत आहे.

शरद पवार सुरुवातीपासूनच भाजपला टार्गेट करतात. तर गेल्या वर्षापासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील भाजपला टार्गेट करायला सुरुवात केली आहे.

यामागे दोन कारण असू शकतात. पहिलं म्हणजे त्यांना मुळावर वार करायचा आहे आणि दुसरं म्हणजे जे गेले त्यांना जास्त महत्त्व द्यायचं नाही.”

शरद पवारांनी सभेसाठी दसरा चौक मैदान का निवडले? याबाबत देखील रोहित पवारांनी (Rohit Pawar) स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, “शरद पवारांनी या सभेसाठी मुद्दाम दसरा चौक मैदान निवडले आहे.

कारण या सभेच्या माध्यमातून पवार साहेबांना शाहू, फुले, आंबेडकरांचे पुरोगामी विचार सर्वांना सांगायचे आहे. या सभेच्या माध्यमातून शरद पवारांना पुरोगामी विचारांची ताकद सांगायची आहे. त्यांच्या या सभेला जागा कमी पडेल, अशी आम्हाला भीती वाटत आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही