Jayant Patil | टीम महाराष्ट्र देशा: 21 ऑगस्ट 2023 रोजी राज्यात तलाठी भरतीसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.
तर याआधी देखील नाशिकमध्ये परीक्षाबाबत असाच धक्कादायक प्रकार घडला होता. या सर्व घटनांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होताना दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारकडे मागणी एक केली आहे.
जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना या संदर्भात पत्र पाठवलं आहे.
जयंत पाटील यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ट्विट करत ते म्हणाले, “तलाठी भरती परीक्षेच्या दरम्यान डाऊन झालेले सर्व्हर, पहिल्याच दिवशी झालेले पेपर फुटण्याचे प्रकरण, म्हाडा भरती परीक्षा प्रक्रियेत झालेले गैरव्यवहार अशी अनेक प्रकरणे घडत आहेत.
यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय यांना या सर्व प्रकरणांची SIT मार्फत चौकशी करत दोषींवर कारवाई करावी.
तसेच अशा घटना पुन्हा घडू नये आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी केंद्र शासनाच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) च्या धर्तीवर स्वतंत्र आयोग किंवा MPSC मध्ये स्वतंत्र विभाग निर्माण करावा अशी मागणी केली.
तलाठी भरती परीक्षेच्या दरम्यान डाऊन झालेले सर्व्हर, पहिल्याच दिवशी झालेले पेपर फुटण्याचे प्रकरण, म्हाडा भरती परीक्षा प्रक्रियेत झालेले गैरव्यवहार अशी अनेक प्रकरणे घडत आहेत. यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे सरकारचे लक्ष… pic.twitter.com/2Ee35P3ynv
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) August 23, 2023
It affects the mentality of students who study honestly – Jayant Patil
दरम्यान, जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र पाठवलं आहे. “भरती परीक्षेदरम्यान अनेक जिल्ह्यात परीक्षा केंद्रावर सर्व्हर बंद पडल्याने परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
नाशिक येथील एका परीक्षा केंद्रावर काही उमेदवारांना गैरप्रकार करताना पोलिसांनी अटक केली असून परीक्षा केंद्र मॅनेज करण्यात येत असल्याचे प्रकार देखील घडत असल्याचे निदर्शनास आले आहे.
तर माढा भरतीमध्ये गैरप्रकार करणाऱ्या 60 आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत. अशा घटनांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असून त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण होत आहे.
सरकारने याबाबतीत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे”, असं जयंत पाटील यांनी या पत्रात म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Rohit Pawar | तुम्ही कुठलेही राजकीय पतंग उडवू नका; रोहित पवारांचा संजय शिरसाटांना टोला
- Ajit Pawar | बंडखोरीनंतर अजित दादा पहिल्यांदाच जाणार बारामतीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- Rohit Pawar | जिथे भाजपचे विचार संपतात, तिथे पवार साहेबांचे सुरू होतात – रोहित पवार
- Rohit Pawar | शरद पवारांनी सभेसाठी दसरा चौक मैदान का निवडले? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं
- Eknath Shinde | CM शिंदेंच्या चिंतेत वाढ! बड्या नेत्यांचा ठाकरे गटात प्रवेश