Uddhav Thackeray | मुंबई: आज शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. या पक्षप्रवेशावेळी मातोश्री निवासस्थानी संगमनेर, शिर्डी आणि नाशिकच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. शिवसैनिक चुकीला माफी देतो. मात्र, पाप करणाऱ्यांना माफी देत नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Shivsainik apologizes for the mistake – Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये एक चमत्कार घडत आहे. महाराष्ट्रातला हा चमत्कार लवकरच संपूर्ण देशात घडणार आहे. 15 दिवसांपूर्वी भाऊसाहेब वाकचौरे मला भेटले होते. त्यावेळी त्यांनी माझी आणि मातोश्रीची माफी मागितली.
मी त्यावेळी त्यांना म्हणालो की, माझी माफी मागितली नाही तरी चालेल पण माझ्या शिवसैनिकांची माफी मागा. आजपर्यंत राजकारणामध्ये आपण अनेक पक्षांतर पाहिली आहे.
मात्र पक्ष संपवण्याचं कटकारस्थान करणारे राजकारणी आणि पक्ष पहिल्यांदाच महाराष्ट्रात दिसले आहे. एखादा जण चुकला तर शिवसैनिक मोठ्या मनानं त्याला माफ करतो.
शिवसैनिक चुकीला माफी देतो पण पापाला माफी देत नाही. राजकारणामध्ये सध्या जी पापी लोक आहे, त्यांना आपल्याला संपवायचं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, “राजकारणामध्ये श्रद्धा आणि सबुरी दोन्हींची आवश्यकता असते. आपल्या नेतृत्वावर आणि आपल्या पक्षावर श्रद्धा असावी. त्याचबरोबर सबुरी देखील तेवढीच महत्वाची आहे.
पण सध्या सत्तेत असलेल्यांकडे श्रद्धा आणि सबुरी दोन्हीही नाही. मी एकटाच, माझा पक्ष राहील आणि बाकीचे पक्ष मी संपवून टाकेल, ही त्यांची (भाजप) मस्ती आपल्याला उतरवायची आहे.
शिर्डीमध्ये लवकरच मी भव्य सभा घेणार आहे. शिर्डीमध्ये साईबाबांच्या साक्षीने मी शिवसेना संपवायला निघालेल्या आव्हान देईल. हिम्मत असेल तर समोर या, हिम्मत असेल तर निवडणुका घ्या, असं आवाहन मी त्यांना करतो.”
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या ताकदीत वाढ! माजी खासदार पुन्हा एकदा ठाकरे गटात
- Jayant Patil | तलाठी भरती परीक्षेतील गोंधळाची STI चौकशी करा; जयंत पाटलांची राज्य शासनाला मागणी
- Rohit Pawar | तुम्ही कुठलेही राजकीय पतंग उडवू नका; रोहित पवारांचा संजय शिरसाटांना टोला
- Ajit Pawar | बंडखोरीनंतर अजित दादा पहिल्यांदाच जाणार बारामतीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- Rohit Pawar | जिथे भाजपचे विचार संपतात, तिथे पवार साहेबांचे सुरू होतात – रोहित पवार