Rahul Narwekar | मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा विषय सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला होता.
काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय दिला होता. सुप्रीम कोर्टाने हा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवला होता. त्यानंतर राहुल नार्वेकरांनी या प्रकरणाचे लवकरात लवकर निर्देश द्यावे, असे सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं.
त्यानंतर नार्वेकर यांनी शिंदे गट आणि ठाकरे गटातील आमदारांना नोटीस बजावली होती. मात्र, त्यानंतर या प्रकरणावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
The right decision will be taken only by following the rules – Rahul Narwekar
आमदारांच्या अपात्रतेवर कारवाई कधी होईल? या प्रश्नाचे उत्तर देत राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) म्हणाले, “आमदारांच्या अपात्रतेवर योग्य ती कारवाई सुरू आहे.
या प्रकरणाची लवकरच सुनावणी चालू करण्यात येणार आहे. या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही, असं आश्वासन मी तुम्हाला देतो.
कारण या प्रकरणातील इतर प्रक्रिया सुरू आहे. नियमांचं पालन करूनच योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे. या याचिकेवर निर्णय घेत असताना मी ‘क्वाजय ज्युडिशियल ऑथेरिटी’ म्हणून काम करत आहे आणि या गोष्टीचा मला पूर्णपणे भान आहे.”
यावेळी बोलत असताना राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी चांद्रयान 3 मोहिमेवर देखील भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “चांद्रयान मोहीम ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.
या मोहिमेसाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो. चांद्रयान मोहीम यशस्वीरित्या होऊन भारताला आणखी एक विक्रम करण्याची संधी मिळणार आहे. सर्व देशवासी या यशाची आतुरतेने वाट बघत आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | शिवसैनिक चुकीला माफी देतो, पाप करणाऱ्यांना नाही; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला इशारा
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या ताकदीत वाढ! माजी खासदार पुन्हा एकदा ठाकरे गटात
- Jayant Patil | तलाठी भरती परीक्षेतील गोंधळाची STI चौकशी करा; जयंत पाटलांची राज्य शासनाला मागणी
- Rohit Pawar | तुम्ही कुठलेही राजकीय पतंग उडवू नका; रोहित पवारांचा संजय शिरसाटांना टोला
- Ajit Pawar | बंडखोरीनंतर अजित दादा पहिल्यांदाच जाणार बारामतीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण