Bacchu Kadu | आम्ही जिथे बसू तिथे सरकार बसणार, आम्ही जिथे उठू तिथे सरकार पडणार – बच्चू कडू

Bacchu Kadu | सातारा: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यात पुन्हा शिंदे-भाजप आणि दादा गटाच्या युतीतच सरकार येईल, असा दावा महायुतीतील नेते करत आहे.

अशात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आम्ही जिथे बसू तिथे सरकार बसणार, आम्ही उठलो तर सरकार पडणार, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

10 to 11 MLAs from Prahar will be elected in the coming elections – Bacchu Kadu

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, “येत्या निवडणुकांमध्ये प्रहारचे 10 ते 11 आमदार निवडून येतील.

त्यामुळं आम्ही जिथे बसू तिथे सरकार बसणार आणि आम्ही उठलो तर सरकार कोसळणार. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीकडून 15 जागा मागणार आहोत.”

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कांद्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं होतं. या प्रकरणावरून बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी देखील सरकारवर खोचक टीका केली होती.

ते म्हणाले, “कांद्याबाबत सरकारनं जो निर्णय घेतला आहे तो फक्त ग्राहकांचं हित जपण्यासाठी आणि सत्तेसाठी घेतला आहे. केंद्रातील सरकार नामर्द आहे.

कांद्याचे भाव वाढल्यानंतर सरकार हस्तक्षेप करताना दिसतं. मात्र, कांद्याचे दर घसरल्यानंतर सरकार कधीच हस्तक्षेप करत नाही. सरकार फक्त कांदा खाणाऱ्या लोकांचा विचार करताना दिसत आहे. परंतु सरकारनं कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा देखील विचार करायला हवा.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.