Samruddhi Highway | टीम महाराष्ट्र देशा: समृद्धी महामार्गाचं जेव्हापासून लोकार्पण झालं आहे, तेव्हापासूनच या महामार्गावर अपघातांची मालिका सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. दिवसेंदिवस अपघात वाढत असल्यामुळं समृद्धी महामार्गावरील वाहतूक तूर्तास थांबवावी, असं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.
समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्या, असं देखील याचिकेत म्हटलं आहे.
Signs should be installed to prevent accidents on Samruddhi Highway
वाढत्या अपघातामुळे समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) जास्त चर्चेत आला आहे. या महामार्गावर अनेक भीषण अपघात घडलेले दिसले आहे.
त्यामुळे लोकांच्या सुरक्षिततेसाठी समृद्धीवर सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्या यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी समृद्धीवर चिन्ह लावावेत.
त्याचबरोबर समृद्धीवर प्राथमिक उपचार केंद्र सुरू करावे, असं या याचिकेमध्ये म्हटलं आहे. या याचिकेवर चार आठवड्यामध्ये उत्तर देण्याचे आदेश खंडपीठाने सरकारला दिले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी ठाकरे गटानं समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) अपघातावरून राज्य सरकारवर खोचक टीका केली होती.
“‘समृद्धी’ महामार्ग हा सध्याच्या राज्यकर्त्यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असेलही, पण तुमचे हे ‘स्वप्न’ निरपराध्यांसाठी ‘काळस्वप्न’ ठरत आहे, त्याचे काय?
राज्यकर्त्यांनी स्वप्न बघायचे आणि त्याची किंमत निरपराध्यांनी आपल्या ‘मृत्यू’ने चुकवायची, असेच समृद्धी महामार्गाबाबत सुरू आहे वारंवार घडणाऱ्या दुर्घटनेने हेच पुन्हा सिद्ध केले.
राज्यकर्त्यांनी समृद्धीच्या महामार्गाचे स्वप्न जरूर पाहावे, पण निरपराध्यांचे रक्त आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू यामुळे जर तुमचा हा महामार्ग सतत भिजत असेल तर त्याला ‘समृद्धी’ कशी म्हणणार?
अपघातग्रस्त समृद्धी महामार्गाने उपस्थित केलेला हा जळजळीत सवाल आहे. या महामार्गाचे कर्ते धर्ते हेच आज राज्याचे मुख्य आणि उपमुख्य आहेत… त्यांच्याकडे या प्रश्नाचे काय उत्तर आहे?”, असं ठाकरे गटाने सामना अग्रलेखात म्हटलं होतं.
महत्वाच्या बातम्या
- Anil Bonde | विरोधकांना बोलण्यासाठी नाक राहिलं नाही; अनिल बोंडेंची शरद पवारांवर खोचक टीका
- Rahul Narwekar | आमदारांच्या अपात्रतेवर कधी कारवाई होईल? राहुल नार्वेकर म्हणतात…
- Uddhav Thackeray | शिवसैनिक चुकीला माफी देतो, पाप करणाऱ्यांना नाही; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला इशारा
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या ताकदीत वाढ! माजी खासदार पुन्हा एकदा ठाकरे गटात
- Jayant Patil | तलाठी भरती परीक्षेतील गोंधळाची STI चौकशी करा; जयंत पाटलांची राज्य शासनाला मागणी