Share

Eknath Khadse | देवेंद्र फडणवीस म्हणजे खोटारडा माणूस – एकनाथ खडसे

🕒 1 min readEknath Khadse | जळगाव: गेल्या महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. गेल्या महिन्यात अजित पवारांसह (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही आमदार शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री तर त्यांच्यासह आलेल्या 08 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

Published On: 

🕒 1 min read

Eknath Khadse | जळगाव: गेल्या महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. गेल्या महिन्यात अजित पवारांसह (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही आमदार शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले आहे.

त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री तर त्यांच्यासह आलेल्या 08 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खोचक टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस खोटारडा माणूस असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

BJP has 105 MLAs – Eknath Khadse

प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले, “सध्या भाजपकडं 105 आमदार आहे. आणि एकनाथ शिंदे गटाकडं साधारण 50 आमदार असतील.

याचा अर्थ असा की सरकारकडं बहुमत होतं. सरकारकडं बहुमत असताना देखील त्यांना बाकीच्या नेत्यांना महायुतीत घेण्याची आवश्यकता नव्हती.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युती करणार नाही. एक वेळ लग्न न करणं पसंत करेल पण राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र, त्यांचं आता काय झालं. देवेंद्र फडणवीस एक खोटारडा माणूस आहे, ते लगेच बदलले.”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सामील होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एक खळबळजनक विधान केलं होतं. ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आम्ही कधीच युती करणार नाही, म्हणजे नाही.

एक वेळ मी लग्न न करणं पसंत करेल. अविवाहित राहणं पसंत करेल. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युती करणार नाही.” देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावरूनच एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी त्यांच्यावर खोचक टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!