Chandrashekhar Bawankule | नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा फोटो वापरल्यास कोर्टात जाऊ असा इशारा शरद पवार गटाने अजित पवार (Ajit Pawar) गटाला दिला असल्याचं बोललं जात आहे.
त्यानंतर अजित पवार गटानं सतर्कता म्हणून शरद पवारांचा फोटो न वापरण्याच्या सूचना दिल्या असल्याचं म्हटलं जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या प्रकरणावर भाष्य करत असताना बावनकुळे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवारांनी आपली उंची कमी करून घेऊ नये, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “शरद पवार मोठ्या विचारांचे नेते आहे. मात्र, शरद पवारांनी त्यांच्यावर निष्ठा असणाऱ्या, त्यांचा फोटो वापरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेणं बंद केलं पाहिजे.
राष्ट्रीय हेतून अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दर्शवला आहे. शिंदे-भाजप सरकारमध्ये जे नेते सामील झाले आहे ते शरद पवारांच्या विरोधात नाही, असं बोललं जातं.
एवढं सगळं होऊन देखील ते नेते शरद पवारांचा फोटो वापरतात, त्यांना आदरानं भेटायला जातात. त्यामुळं त्यांच्या विरोधात सभा घेऊन शरद पवारांनी आपली उंची कमी करून घेऊ नये.”
Sharad Pawar’s mind will change for sure – Chandrashekhar Bawankule
पुढे बोलताना ते (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इस्रोची चांद्रयान तीन मोहीम यशस्वीरित्या पार पडली.
त्याचप्रमाणे एक ना एक दिवस शरद पवारांचं मन परिवर्तन नक्की होईल. वेळ आणि काळ काही गोष्टी ठरवत असतो. अजित पवार आणि एकनाथ शिंदे आमच्यासोबत येतील असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं.
मात्र, त्यांचं मन परिवर्तन झालं आणि ते आमच्यासोबत आले. त्याचबरोबर शरद पवारांचं एक दिवस नक्की मन परिवर्तन होईल, असं मला अजूनही वाटत आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Jayant Patil | जयंत पाटील अजित पवार गटात जाणार? ‘त्या’ घटनेवरून चर्चांना उधाण
- Chandrashekhar Bawankule | घरात बसून पक्ष चालवणारे कुणाला संपवू शकत नाही; बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका
- Bacchu Kadu | आम्ही जिथे बसू तिथे सरकार बसणार, आम्ही जिथे उठू तिथे सरकार पडणार – बच्चू कडू
- Supriya Sule | अजित पवारांसाठी परतीचा मार्ग खुला आहे? सुप्रिया सुळे म्हणतात…
- Eknath Khadse | देवेंद्र फडणवीस म्हणजे खोटारडा माणूस – एकनाथ खडसे