Jayant Patil | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जयंत पाटील यांनी शरद पवार गटाला पाठिंबा दर्शवला आहे.
अशात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काल जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे. या माहितीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे.
Ajit Pawar held a meeting with Sangli officials in Mumbai
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडं पुणे, सातारा आणि सांगलीची जबाबदारी आहे. ही जबाबदारी मिळाल्यानंतर अजित पवारांनी पहिल्यांदाच सांगलीतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
काल (23 ऑगस्ट) सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक पार पडली.
त्यांच्या या बैठकीत जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या कार्यकर्त्यांचा देखील समावेश होता. या घटनेनंतर जयंत पाटील अजित पवार गटात प्रवेश करणार का? या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) पुन्हा एकदा पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. यासाठी शरद पवार महाराष्ट्रभर दौरे करताना दिसत आहे.
शरद पवारांचा पुढचा दौरा कोल्हापुरात होणार आहे. या दौऱ्यादरम्यान ते कोल्हापूर शहरातील दसरा चौकात जाहीर सभा घेणार आहे.
शरद पवारांनी कोल्हापूरमध्ये सभा घेण्यासाठी दसरा चौक मैदान मुद्दाम निवडलं असल्याचं, रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटलं आहे.
या सभेच्या माध्यमातून शरद पवारांना शाहू, फुले, आंबेडकर यांचे पुरोगामी विचार देशाला सांगायचे आहे, म्हणून शरद पवारांनी या सभेसाठी हे मैदान निवडलं असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Chandrashekhar Bawankule | घरात बसून पक्ष चालवणारे कुणाला संपवू शकत नाही; बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका
- Bacchu Kadu | आम्ही जिथे बसू तिथे सरकार बसणार, आम्ही जिथे उठू तिथे सरकार पडणार – बच्चू कडू
- Supriya Sule | अजित पवारांसाठी परतीचा मार्ग खुला आहे? सुप्रिया सुळे म्हणतात…
- Eknath Khadse | देवेंद्र फडणवीस म्हणजे खोटारडा माणूस – एकनाथ खडसे
- Samruddhi Highway | राज्य सरकारला नोटीस; समृद्धी महामार्गावरील वाहतूक थांबणार?