Anil Deshmukh | मुळात बावनकुळेंची उंची कमी; अनिल देशमुखांचं बावनकुळेंना प्रत्युत्तर

Anil Deshmukh | मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर खोचक टीका केली आहे. शरद पवारांनी आपली उंची कमी करू नये, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या टीकेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुळात बावनकुळे यांची उंची कमी आहे, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar does not need to be taught common sense by Bawankule – Anil Deshmukh 

अनिल देशमुख (Anil Deshmukh) म्हणाले, “चंद्रशेखर बावनकुळे हे भारतीय जनता पक्षासारख्या मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहे. एवढ्या मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी असलेल्या व्यक्तीला अशा प्रकारचं व्यक्तव्य करणं शोभत नाही.

मुळात चंद्रशेखर बावनकुळे यांची उंची कमी आहे. त्यामुळं शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी आणि वरिष्ठ नेत्याला बावनकुळे यांनी अक्कल शिकवण्याची गरज नाही.

आमच्यापासून दूर गेलेले अनेक नेते अजूनही शरद पवारांना दैवत म्हणतात. मात्र, शरद पवार यांनी त्यांना त्यांचा फोटो न वापरण्याच्या  सूचना दिल्या होत्या. त्यामुळं त्यांनी देखील शरद पवारांच्या सूचनेचं पालन केलं पाहिजे.”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवारांनी अजित पवार गटाला त्यांचा फोटो न वापरण्याच्या सूचना दिल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

ते म्हणाले, “शरद पवार खूप मोठ्या विचारांचे नेते आहे. शरद पवारांनी त्यांच्यावर निष्ठा असणाऱ्या, त्यांचा फोटो वापरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्या विरोधात सभा घेणं बंद केलं पाहिजे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर देखील अजित पवार गटाचे नेते शरद पवारांना भेटायला जातात, त्यांचा फोटो वापरतात. त्यामुळे शरद पवारांनी त्यांच्या विरोधात सभा घेऊन आपली उंची कमी करू नये.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.