Sanjay Raut | मुंबई: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या एनडीए टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली आहे.
इंडिया आघाडीच्या आतापर्यंत दोन बैठका पार झाल्या आहे. पहिली बैठक बिहारच्या पाटणा शहरात झाली तर दुसरी बैठक कर्नाटकच्या बंगळूर शहरामध्ये पार पडली.
तर विरोधकांच्या आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. 31 आणि 01 तारखेला ही बैठक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
BJP is seen taking action against the opposition – Sanjay Raut
आज प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “31 ऑगस्ट आणि 01 सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे.
या बैठकीची जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजप विरोधकांवर कारवाई करताना दिसत आहे. इंडिया आघाडीमधून कोणताही पक्ष दवाखालून बाहेर पडणार नाही.
भाजपच्या इशाऱ्यावरून महाराष्ट्राचे पोलीस विरोधकांवर ज्या पद्धतीनं कारवाई करताना दिसत आहे. त्यांनी सर्वप्रथम कायद्याचं वाचन करायला हवं. 2024 मध्ये देशात आणि महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार येणार आहे आणि ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवावी.”
दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “आगामी निवडणुकांमध्ये प्रहारचे 10 ते 11 आमदार निवडून येणार आहे.
त्यामुळं आम्ही जिथे बसू तिथे सरकार बसणार आणि आम्ही उठलो तर सरकार पडणार. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी आम्ही महायुतीकडे 15 जागा मागणार आहोत.”
बच्चू कडू यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातुन काय प्रतिक्रिया येतील? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Chandrashekhar Bawankule | शरद पवारांनी आपली उंची कमी करू नये – चंद्रशेखर बावनकुळे
- Jayant Patil | जयंत पाटील अजित पवार गटात जाणार? ‘त्या’ घटनेवरून चर्चांना उधाण
- Chandrashekhar Bawankule | घरात बसून पक्ष चालवणारे कुणाला संपवू शकत नाही; बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका
- Bacchu Kadu | आम्ही जिथे बसू तिथे सरकार बसणार, आम्ही जिथे उठू तिथे सरकार पडणार – बच्चू कडू
- Supriya Sule | अजित पवारांसाठी परतीचा मार्ग खुला आहे? सुप्रिया सुळे म्हणतात…