Sharad Pawar | बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार महाराष्ट्रभर जाहीर सभा घेताना दिसत आहे.
अशात आज कोल्हापूर शहरामध्ये पवारांची जाहीर सभा पार पडणार आहे. कोल्हापूरला रवाना होण्यापूर्वी शरद पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मोठं विधान केलं आहे.
अजित पवार (Ajit Pawar) आमचे नेते आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पवारांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
There is no split in the NCP – Sharad Pawar
प्रसार माध्यमांशी बोलत असताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “अजित पवार आमचे नेते आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणत्याही प्रकारची फूट नाही.
काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे पक्षात फूट पडत नाही. आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीलाच अधिक जागा मिळतील.”
दरम्यान, सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील अजित पवार यांच्याबद्दल भाष्य केलं होतं. अजित पवारांसाठी परतीचा मार्ग खुला आहे का?
यावर उत्तर देत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आतापर्यंत घडलेल्या सर्व घटना आमच्यासाठी खूप निराशाजनक आहे. परंतु, त्यांना परत येण्याची परवानगी आहे असं नाही. ते परत येतील की नाही? याबद्दल मी काहीच सांगू शकत नाही.
मात्र, कुटुंब म्हणून आम्ही एकत्र राहण्याचा प्रयत्न करणार आहोत. कुटुंबामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचं राजकारण येऊ नये, यासाठी प्रयत्न करणार आहोत.
अजित पवार गटाशी आमचा वैचारिक लढा असला तरी कुटुंब म्हणून आम्ही एकच आहोत. अजित पवार काही आमदारांसह भाजप सोबत गेले. यामागे नक्की काहीतरी विशेष कारण असेल.
सत्तेत सामील झाल्यानंतर अजित पवार गटातील नेत्यांनी कोणत्याही प्रकारचे आरोप केलेले नाही. पक्षातील काही नेत्यांना भाजपसोबत जाणं योग्य वाटलं आणि ते भाजपसोबत गेले.”
महत्वाच्या बातम्या
- Vijay Wadettiwar | अजित पवारांना सोबत घेऊन भाजपवर पश्चातापाची वेळ येणार – विजय वडेट्टीवार
- Sanjay Shirsat | शरद पवारांनी टाकलेली गुगली त्यांच्या पक्षाला डुबवून गेली; संजय शिरसाटांनी उद्धव ठाकरेंचे कान टोचले
- Chandrashekhar Bawankule | आमच्यावर पक्ष फोडण्याचे संस्कार नाही; बावनकुळेंचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर
- Hasan Mushrif | रोहित पवारांना अजितदादांची जागा घ्यायची- हसन मुश्रीफ
- Chitra Wagh | कुछ लोग बातों में खुद की औकात बता देते हैं; चित्रा वाघांचा संजय राऊतांना टोला