Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. अशात विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
अजित पवारांना सोबत घेऊन भाजपवर पश्चाताप करण्याची वेळ येणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहे.
विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “शरद पवारांबाबत संशय निर्माण होईल, अशी विधानं काही नेते मंडळी करताना दिसत आहे. मात्र मला शरद पवार यांच्याबाबत कोणत्याही प्रकारचा संशय वाटत नाही. विरोधकांची इंडिया आघाडी अत्यंत मजबूत आहे.
कुणी काहीही म्हणलं तरी इंडिया आघाडीत फूट पडणार नाही. अजित पवारांबाबतही सध्या हेच सुरू आहे. अजित पवार नक्की कुणासोबत आहे, हे येणाऱ्या काळात कळेल आणि तो काळ कुणासाठी ‘काळ’ ठरेल हे सुद्धा त्यावेळी कळेल.
अजित पवार परत येणार का नाही? याबाबत आता बोलणं योग्य नाही. मात्र, अजित पवारांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षावर पश्चाताप करण्याची वेळ येणार आहे.
NCP voters are always standing with Sharad Pawar – Vijay Wadettiwar
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांच्या वारंवार भेटी होताना दिसत आहे.
यावर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “शरद पवार आणि अजित पवार यांची अनेक व्यवसाय आणि संस्थांमध्ये भागीदारी असू शकते. त्याबाबत त्यांची भेट आणि चर्चा झाली असेल.
त्यामुळं त्यांच्या भेटीचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. कुणी कुठेही गेलं, तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मतदार हा शरद पवारांच्या पाठीशी कायम उभा आहे.
भारतीय जनता पक्षाच्या नीतिमत्तेवर बोलण्यात काही अर्थ नाही. उद्धव ठाकरे जे बोलले आहे ते खरं आहे. भाजप आणि नीतिमत्तेचा काहीही संबंध राहिलेला नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat | शरद पवारांनी टाकलेली गुगली त्यांच्या पक्षाला डुबवून गेली; संजय शिरसाटांनी उद्धव ठाकरेंचे कान टोचले
- Chandrashekhar Bawankule | आमच्यावर पक्ष फोडण्याचे संस्कार नाही; बावनकुळेंचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर
- Hasan Mushrif | रोहित पवारांना अजितदादांची जागा घ्यायची- हसन मुश्रीफ
- Chitra Wagh | कुछ लोग बातों में खुद की औकात बता देते हैं; चित्रा वाघांचा संजय राऊतांना टोला
- Anil Deshmukh | मुळात बावनकुळेंची उंची कमी; अनिल देशमुखांचं बावनकुळेंना प्रत्युत्तर