Share

Ambadas Danve | शरद पवारांच्या वक्तव्याचा मविआ परिमाण होणार नाही – अंबादास दानवे

Ambadas Danve | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणत्याही प्रकारची फूट नाही. अजित पवार (Ajit Pawar) आमचे नेते आहे. काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे पक्षात फूट … Read more

Published On: 

Ambadas Danve | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणत्याही प्रकारची फूट नाही. अजित पवार (Ajit Pawar) आमचे नेते आहे. काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे पक्षात फूट पडत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांच्या या वक्तव्यावर विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar’s statement will not affect the Mahavikas Aghadi – Ambadas Danve

अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले, “भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीचं प्रकरण निवडणूक आयोगाकडं जाईल. त्यामुळं आपला पक्ष आणि आपलं चिन्ह वाचवण्यासाठी शरद पवारांनी हे वक्तव्य केलं असावं, असं मला वाटतं.

मात्र, अशा विधानांमुळे नेतृत्वांमध्ये नाही पण कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि हे सत्य आहे. हे सत्य आपल्याला नाकारता येत नाही. मात्र, शरद पवार यांच्या विधानाचा महाविकास आघाडीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही.”

दरम्यान, शरद पवार यांच्या वक्तव्यावर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, “शरद पवार मोठे नेते आहे. पवारांना त्यांच्या पक्षाची काळजी असेल म्हणून त्यांनी हे विधान केलं असेल. उद्या राष्ट्रवादीच्या फुटीचं प्रकरण निवडणूक आयोगाकडं जाईल, त्यानंतर न्यायालयात जाईल.

म्हणून शरद पवारांनी हे विधान केलं असेल. ही पवारांची रणनीती असू शकते. त्यामुळं या प्रकरणावर मी जास्त बोलणार नाही. प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करत असतो.

काही वेळा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात आघाडी तुटते. तर कोण कुठे जाईल? हे निवडणुकांमध्येच कळते. मात्र, यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची भीती नाही. कारण आमच्यासोबत अनेक आघाड्या आणि शरद पवार साहेब आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही