Vijay Wadettiwar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडून एक महिन्याहून अधिक काळ उलटून गेला आहे. मात्र, या दरम्यान शरद पवार गट (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) गट दोन्हींमध्ये मतभेद नसल्याचं दिसून आलं आहे.
अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार आमचे नेते असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांच्या या वक्तव्यावर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्वार्थासाठी अनेक लोक बरबटले असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
Sharad Pawar is a great leader – Vijay Wadettiwar
विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “शरद पवार मोठे नेते आहे. त्यांना त्यांच्या पक्षाची काळजी असेल म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलं असेल.
उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीचं प्रकरण निवडणूक आयोगाकडं जाईल, त्यानंतर न्यायालयात जाईल. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून शरद पवारांनी हे विधान केलं असेल. ही त्यांची रणनीती असू शकते. म्हणून त्यांच्या या विधानावर मी अधिक बोलणार नाही.”
पुढे बोलताना ते (Vijay Wadettiwar) म्हणाले, “प्रत्येक पक्षाला आपापल्या पद्धतीनं तयारी करावी लागते. अनेकदा निवडणुकादरम्यान शेवटच्या टप्प्यात आघाडी तुटते. त्यावेळी प्रत्येक पक्ष आपली रणनीती तयार ठेवत असतो.
कोण कुठे जाईल? हे निवडणुकादरम्यान कळेल. मात्र आम्हाला कुठल्याही प्रकारची भीती नाही. कारण आमच्याबरोबर अनेक आघाड्या आहे. त्याचबरोबर पवार साहेब देखील आमच्यासोबत आहे.
आज स्वार्थासाठी अनेक लोक बरबटलेले आहे. स्वार्थामुळं अनेक नेत्यांना लोकांच्या मताशी काही घेणं-देणं नाही. काही नेते लोकांना गृहीत धरून राज्याचं राजकारण खड्ड्यात घालायचं काम करत आहे.”
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणत्याही प्रकारची फूट नाही. अजित पवार आमचे नेते आहे. काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे पक्षात फूट पडत नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Chandrashekhar Bawankule | ठाकरे गटाचं यान संजय राऊत यांच्या नेतृत्वात भरकटलं – चंद्रशेखर बावनकुळे
- Uddhav Thackeray | ‘मिशन सन’ ठीक, आधी कांद्याचे ‘यान’ लॅण्ड करा; ठाकरे गटाचा मोदी सरकारवर निशाणा
- Chandrashekhar Bawankule | 2024 नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
- Sharad Pawar | अजित पवार आमचे नेते – शरद पवार
- Vijay Wadettiwar | अजित पवारांना सोबत घेऊन भाजपवर पश्चातापाची वेळ येणार – विजय वडेट्टीवार