Share

Chandrashekhar Bawankule | शरद पवार आणि सुप्रिया सुळे लवकरच भाजपला पाठिंबा देतील – चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule | अमरावती: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवारांबाबत (Ajit Pawar) मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार भाजपसोबत गेले, म्हणून पक्षात फूट पडली असं होत नाही. अजित पवार आमचे नेते आहे. काही लोकांनी दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला म्हणजे आमच्या पक्षात फूट पडली असं नाही, असं शरद पवार यांनी … Read more

Published On: 

Chandrashekhar Bawankule | अमरावती: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवारांबाबत (Ajit Pawar) मोठं वक्तव्य केलं आहे.

अजित पवार भाजपसोबत गेले, म्हणून पक्षात फूट पडली असं होत नाही. अजित पवार आमचे नेते आहे. काही लोकांनी दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला म्हणजे आमच्या पक्षात फूट पडली असं नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) लवकरच भाजपला पाठिंबा देतील, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar and Supriya Sule will support BJP in the future – Chandrashekhar Bawankule

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “गेल्या नऊ वर्षात नरेंद्र मोदींनी अनेक विकास काम केली आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली विश्वकर्मा योजना, ओबीसी घटकांकरता योजना अशा अनेक योजना सुरू झाल्या आहे.

मोदी सरकारचं हे काम बघून शरद पवार लवकरच भाजपसोबत येतील. शरद पवार आणि सुप्रिया सुळे येणाऱ्या काळात भाजपला पाठिंबा देतील. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं लवकरच मन परिवर्तन होईल.

दरम्यान, याआधी देखील चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी याबाबत वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले, “नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चांद्रयान मोहीम यशस्वीरित्या पार पडली.

त्याचप्रमाणे शरद पवारांचं एक ना एक दिवस मन परिवर्तन नक्की होईल. काही गोष्टी काळ आणि वेळ ठरवत असते. अजित पवार आणि एकनाथ शिंदे भाजप सोबत येतील, असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं.

परंतु, त्यांचं मन परिवर्तन झालं आणि त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यांच्याप्रमाणे शरद पवारांचं एक दिवस नक्की मन परिवर्तन होईल, असं मला अजूनही वाटत आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही