Share

Bacchu Kadu | काका-पुतणे महाराष्ट्राला वेड्यात काढताय? बच्चू कडू स्पष्टचं बोलले

🕒 1 min readBacchu Kadu | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले. यानंतर दोन्ही गट एकमेकांचा विरोध करताना दिसले नाही. अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार आमचे नेते आहे. काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे … Read more

Published On: 

🕒 1 min read

Bacchu Kadu | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले. यानंतर दोन्ही गट एकमेकांचा विरोध करताना दिसले नाही.

अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार आमचे नेते आहे. काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे पक्षात फूट पडत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणतेही प्रकारची फूट नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्यावर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काका-पुतणे महाराष्ट्राला वेड्यात काढत आहे का? या प्रश्नाचं उत्तर देत बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, “हा काय प्रश्न आहे? वाटतंय काय. ही बाब सूर्यप्रकाशाइतकी खरी आहे. याबाबत प्रश्न विचारण्याची गरज काय?”

All surveys are bogus – Bacchu Kadu

यावेळी बोलत असताना आमदार बच्चू कडू यांनी व्होटर सर्व्हेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “सगळे सर्व्हे बोगस असतात. सत्य नेहमी मतदानानं समोर येतं.

पक्षांनी केलेले सर्व्हे आणि सामान्य माणसाच्या तोंडातील वाक्य, यामध्ये खूप मोठा फरक आहे. या सर्व्हेनंतर जनता अचानक मोठा धक्का देऊ शकते. सर्व्हेला कोणत्याही प्रकारची किंमत नाही. कारण मागच्यावेळी केलेला सर्वे पूर्णपणे खोटा ठरला आहे.”

दरम्यान, शरद पवार यांच्या वक्तव्यावर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीचं प्रकरण भविष्यामध्ये निवडणूक आयोगाकडं जाईल. म्हणून आपला पक्ष आणि आपलं चिन्ह वाचवण्यासाठी शरद पवारांनी हे वक्तव्य केलं असावं, असं माझं वैयक्तिक मत आहे.

परंतु वरिष्ठ नेत्यांच्या अशा विधानांमुळे नेतृत्वांमध्ये नाही, पण कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. हे सत्य आहे आणि ते आपल्याला नाकारता येत नाही. पण शरद पवार यांच्या या वक्तव्याचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या