Sharad Pawar | सातारा: आज सकाळपासूनच राज्याच्या राजकीय वर्तुळात शरद पवार यांचं एक विधान चर्चेत आहे. अजित पवार (Ajit Pawar) आमचे नेते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटलं होतं.
यानंतर आज सकाळी बारामतीत पत्रकारांशी संवाद साधत असताना शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याला दुजोरा दिला होता. यानंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. अजित पवारांबद्दल मी असं बोललोच नव्हतो, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
Ajit Pawar should not ask for another chance – Sharad Pawar
प्रसार माध्यमांशी बोलत असताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “अजित पवार आमचे नेते आहे, हे सुप्रिया सुळे म्हणू शकतात. मात्र, मी असं वक्तव्य केलेलं नाही. आमच्या पक्षात फूट पडली नाही, असं मी म्हटलं आहे.
पहाटेचा शपथविधी झाला, त्यानंतर अजित पवारांना संधी देण्यात आली होती. माझ्याकडून जे झालं ते योग्य नव्हतं, आता त्या मार्गावर मी पुन्हा जाणार नाही असं अजित पवारांनी म्हटलं होतं.
त्यामुळं तेव्हा त्यांना दुसरी संधी देण्यात आली. मात्र, आता त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही. अजित पवारांनी पुन्हा संधी मागू नये.”
तुमच्या पक्षात फूट पडलेली नाही, मग तुम्ही निवडणूक आयोगाकडं का गेलात? या प्रश्नाचं उत्तर देत शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “आमच्या पक्षामध्ये कोणी जर चुकीची भूमिका घेत असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
मात्र, याचा अर्थ असा होत नाही की ती पक्षातील फूट आहे. एखादा मोठा गट फुटला गेला तर त्याला फुट म्हणतात. मात्र आमच्यातील काही लोकांनी वेगळी भूमिका बजावलेली आहे. त्यामुळं त्याला फूट म्हणता येत नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde | अखेर देवानं आम्हाला आशीर्वाद दिला; शरद पवारांच्या वक्तव्यावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
- Chandrashekhar Bawankule | शरद पवार आणि सुप्रिया सुळे लवकरच भाजपला पाठिंबा देतील – चंद्रशेखर बावनकुळे
- Bacchu Kadu | काका-पुतणे महाराष्ट्राला वेड्यात काढताय? बच्चू कडू स्पष्टचं बोलले
- Ambadas Danve | शरद पवारांच्या वक्तव्याचा मविआ परिमाण होणार नाही – अंबादास दानवे
- Vijay Wadettiwar | स्वार्थासाठी अनेक लोक बरबटले; शरद पवारांच्या विधानावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया