🕒 1 min read
Ajit Pawar | पिंपरी-चिंचवड: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज सकाळी अजित पवारांबद्दल मोठं विधान केलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेली नसून अजित पवार आमचेच नेते आहे, असं शरद पवारांनी म्हटलं होतं. शरद पवार यांच्या या वक्तव्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी शरद पवारांच्या या विधानावर दोन शब्दात उत्तर दिलं आहे.
I don’t want to talk about this – Ajit Pawar
पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असताना अजित पवारांनी (Ajit Pawar) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना शरद पवारांच्या विधानावरून प्रश्न विचारला.
त्यावर उत्तर देत अजित पवार म्हणाले, “नो कमेंट्स, मला आज या विषयावर बोलायचं नाही. नो कमेंट्स म्हटल्यानंतर त्यावर बोलण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
शहरातील प्रश्न, विकास काम, त्या संदर्भात पारदर्शकता कशी आणता येईल? याबाबत मला प्रश्न विचारा. बाकी इतर गोष्टीबद्दल बोलून मी वेळ घालवू इच्छित नाही.”
दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) आमचेच नेते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडलेली नाही, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटलं होतं.
आज सकाळी बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत असताना शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याला दुजोरा दिला होता. यानंतर शरद पवारांनी यूटर्न घेतला आहे.
अजित पवार आमचे नेते आहे, असं मी बोललोच नव्हतो, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. शरद पवार म्हणाले, “अजित पवार आमचे नेते आहे, हे सुप्रिया सुळे म्हणू शकतात.
मात्र, मी असं विधान केलेलं नाही. राष्ट्रवादीत फूट पडली नाही, असं मी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या या स्पष्टीकरणानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | अजित पवार आमचे नेते, असं मी म्हणालो नाही – शरद पवार
- Dhananjay Munde | अखेर देवानं आम्हाला आशीर्वाद दिला; शरद पवारांच्या वक्तव्यावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
- Chandrashekhar Bawankule | शरद पवार आणि सुप्रिया सुळे लवकरच भाजपला पाठिंबा देतील – चंद्रशेखर बावनकुळे
- Bacchu Kadu | काका-पुतणे महाराष्ट्राला वेड्यात काढताय? बच्चू कडू स्पष्टचं बोलले
- Ambadas Danve | शरद पवारांच्या वक्तव्याचा मविआ परिमाण होणार नाही – अंबादास दानवे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










