Supriya Sule | पुणे: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला होता. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले.
अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर शरद पवारांनी त्यांच्या विरोधात कोणतीही ठोस कारवाई केली नाही. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Will action be taken against Ajit Pawar?
अजित पवारांवर कारवाई करणार का? या प्रश्नाचं उत्तर देत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “एमएटीची सभा झाल्यानंतर कोणीही पक्षाविरोधात काहीच बोललेलं नाही. त्यामुळं ज्यांच्यावर आम्हाला कारवाई करायची होती ती आम्ही केली आहे.
त्यानंतर आम्ही त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील 09 आमदार आणि 02 खासदारांनी वेगळी भूमिका बजावली आहे.
ती आम्हाला आणि आमच्या विचारधारेला पटलेली नाही. म्हणून पक्षानं त्यांना याबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे. याबाबत आम्ही लोकसभा अध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे.”
अजित पवारांचं नेतृत्व मान्य आहे का? यावर उत्तर देत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “संपूर्ण महाराष्ट्राला अजित पवारांचं नेतृत्व मान्य आहे. प्रत्येक पक्षामध्ये चांगल्या विचाराचे नेते असतात.
त्याचबरोबर प्रत्येकामध्ये चांगले गुण असतात. आम्ही एनडी पाटील, अटल बिहारी वाजपेयी यांचं नेतृत्व मान्य केलं होतं. नेत्यांमधील गुण आणि नेतृत्व समाजाला मान्य असतात.”
यावेळी बोलत असताना सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांच्या फोटोच्या मुद्द्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “शरद पवारांना जे देशाचा नेता मानतात त्यांनी पवार साहेबांचा फोटो वापरायला हरकत नाही.
मात्र जे पक्षाच्या, मणिपूरच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन काम करतात, त्यांनी शरद पवारांचा फोटो वापरू नये. त्या लोकांची भूमिका आम्हाला मान्य नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule | अजित पवारांचं नेतृत्व मान्य आहे? सुप्रिया सुळे म्हणतात…
- Sanjay Raut | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेली आहे – संजय राऊत
- Ajit Pawar | मला त्या विषयावर बोलायचं नाही; शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया
- Sharad Pawar | अजित पवार आमचे नेते, असं मी म्हणालो नाही – शरद पवार
- Dhananjay Munde | अखेर देवानं आम्हाला आशीर्वाद दिला; शरद पवारांच्या वक्तव्यावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया