Share

Narendra Modi | 23 ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करणार – नरेंद्र मोदी

Narendra Modi | बंगळुरू: जगभरात भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेचं कौतुक केलं जात आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी भारतानं ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडली. यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरू येथील इस्रोतील कमांड नेटवर्क मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये पोहोचले आहे. चांद्रयान 3 मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोमध्ये दाखल झाले आहे. यावेळी पंतप्रधान … Read more

Published On: 

Narendra Modi | बंगळुरू: जगभरात भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेचं कौतुक केलं जात आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी भारतानं ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडली.

यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरू येथील इस्रोतील कमांड नेटवर्क मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये पोहोचले आहे. चांद्रयान 3 मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोमध्ये दाखल झाले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे.

Scientists in India have made the impossible possible – Narendra Modi

23 ऑगस्ट 2023 रोजी इस्रोची रोजी चांद्रयान 3 मोहीम यशस्वीरित्या पार पडली. याच पार्श्वभूमीवर दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केली आहे.

यावेळी शास्त्रज्ञांशी संवाद साधत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भारतातील शास्त्रज्ञांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं आहे. त्यासाठी तुमचं कितीही कौतुक केलं तरी ते कमीच आहे.

इस्रोच्या या यशानंतर भारताचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. आजच्या भारतानं मोठा इतिहास घडवला आहे. ज्या ठिकाणी कोणीच पोहोचलं नव्हतं, तिथे आम्ही पोहोचलो आहोत.

एकेकाळी भारताची गणना तिसऱ्या रांगेत व्हायची. मात्र, आज भारताची गणना पहिल्या रांगेत उभ्या असलेल्या देशांमध्ये होत आहे आणि यामध्ये इस्रोचा मोठा वाटा आहे.

विक्रम लॅँडर चंद्रावर ज्या ठिकाणी उतरलं त्या ठिकाणचं नामकरणही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलं आहे.

विक्रम लॅँडर ज्या ठिकाणी उतरलं आहेत ते ठिकाण ‘शिवशक्ती पॉईंट’ म्हणून ओळखलं जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तर चांद्रयान 2 उतरलेल्या जागेला ‘तिरंगा’ असं नाव नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही