Nawab Malik | नवाब मलिक कोणत्या गटाला पाठिंबा देणार? मलिकांच्या मुलीनं स्पष्टच सांगितलं

Nawab Malik | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक गेल्या अनेक महिन्यांपासून मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे जेलमध्ये होते. नवाब मलिक जेलमध्ये असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आहे.

वैद्यकीय कारणामुळे त्यांना दोन महिन्यांसाठी जामीन देण्यात आला आहे. त्यांना जामीन मिळाल्यानंतर ते राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाला पाठिंबा दर्शवणार?

याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे. अशात नवाब मलिक यांच्या मुलीनं याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विट नंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

We are currently prioritizing only father’s health – Sana Malik

ट्विट करत सना मलिक (Sana Malik) म्हणाल्या, “माझ्या वडिलांनी विशिष्ट गटाला पाठिंबा दिल्याबद्दल काही बातम्या प्रसारित केल्या जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. या सर्व खोट्या अफवा आहेत. आम्ही सध्या फक्त वडिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत आहोत.”

सना मलिक यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सना मलिक यांच्या या ट्विटनंतर नवाब मलिक (Nawab Malik) काय भूमिका घेतील? याकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, नवाब मलिक (Nawab Malik) राष्ट्रवादी शरद पवार गटाला पाठिंबा देणार असल्याचं एका इंग्रजी वृत्तपत्रानं म्हटलं होतं. “गेल्या 18 महिन्यांपासून मला आणि माझ्या कुटुंबाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

त्याचबरोबर गेल्या अनेक महिन्यापासून मी किडनीच्या आजारामुळे त्रस्त आहे. तब्येतीची व्यवस्थित काळजी घेतली तर मी महिन्याभरात ठीक होऊ शकतो.

त्यामुळं मी माझ्या प्रकृतीला प्रथम प्राधान्य देणार आहे. यासाठी मी मुंबईतील चांगल्या डॉक्टरांकडून उपचार घेईल”, असं नवाब मलिक यांनी म्हटलं असल्याचं त्या वृत्तामध्ये नमूद करण्यात आलं होतं.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.