Hasan Mushrif | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर खोचक टीका केली आहे.
ईडीच्या भीतीनं कोल्हापुरातील काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे. ते ईडीला सामोरे जातील, असं आम्हाला वाटलं होतं. मात्र, त्यांनी ती हिम्मत दाखवली नाही.
त्यांनी भाजपसोबत जाणं पसंत केलं, असं म्हणत शरद पवारांनी नाव न घेत हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार यांच्या या टीकेला हसन मुश्रीफ यांनी दोन शब्दात उत्तर दिलं आहे.
शरद पवार यांच्या टीकेवर उत्तर देत हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले, “नो कमेंट्स. अजित पवार यांच्यासह आम्ही भाजप सरकारमध्ये का सामील झालो आहोत? याबद्दल आम्ही याआधी स्पष्टीकरण दिलं आहे.
आमचा हा निर्णय सामूहिक आहे. त्याचबरोबर पक्षाचा विस्तार करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. याबद्दल आम्ही आमचे दैवत म्हणजे शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली होती.”
Some NCP MLAs have gone aside – Sharad Pawar
दरम्यान, यावेळी बोलत असताना शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, “पक्ष म्हणजे पक्ष संघटना. पक्ष म्हणजे आमदार नव्हे. राष्ट्रवादीतील काही आमदार बाजूला गेले आहे ही वस्तुस्थिती आहे.
मात्र याचा अर्थ पक्षात फुट आहे, असा होत नाही. त्या आमदारांना पक्षाचा अध्यक्ष कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यांनी शरद पवार असं उत्तर दिलं होतं.”
शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | काही आमदार बाजूला गेले म्हणजे पक्षात फूट पडत नाही – शरद पवार
- Uddhav Thackeray | सत्ता येताच मंडळींनी ‘ईव्हीएम’ची पूजा सुरू केलीय; ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- Narendra Modi | 23 ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करणार – नरेंद्र मोदी
- Supriya Sule | अजित पवारांवर कारवाई करणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या…
- Supriya Sule | अजित पवारांचं नेतृत्व मान्य आहे? सुप्रिया सुळे म्हणतात…