Share

Sudhir Mungantiwar | भाजपमध्ये येणार नाही असं वडेट्टीवारांनी जाहीर करावं – सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar | नागपूर: विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाजप सरकारवर खोचक टीका केली आहे. धार्मिक तेढ, जातीय तेढ आणि द्वेष निर्माण करण्याची भारतीय जनता पक्षाची विचारधारा आहे. 2024 ची निवडणूक भारतीय जनता पक्षाची शेवटची निवडणूक असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया … Read more

Published On: 

Sudhir Mungantiwar | नागपूर: विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाजप सरकारवर खोचक टीका केली आहे.

धार्मिक तेढ, जातीय तेढ आणि द्वेष निर्माण करण्याची भारतीय जनता पक्षाची विचारधारा आहे. 2024 ची निवडणूक भारतीय जनता पक्षाची शेवटची निवडणूक असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार कधीच भाजपमध्ये येणार नाही एवढं त्यांनी जाहीर करावं, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

The upcoming election may be the last election of the Congress – Sudhir Mungantiwar

सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, “भाजप विरोधात विधान करून विजय वडेट्टीवार काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु हा त्यांचा खूप मोठा गैरसमज आहे.

विजय वडेट्टीवार कधीच भाजपमध्ये येणार नाही, एवढंच त्यांनी स्पष्ट करावं. कोणती कुणाची शेवटची निवडणूक आहे, हे लोकांच्या लक्षात आलं असेल.

आगामी निवडणूक काँग्रेसची शेवटची निवडणूक असू शकते. राजकीय पक्षांचा इतिहास शिकवायचा असेल तर सर्व पक्षांचा इतिहास शिकवला जाईल. यामध्ये काँग्रेस, समाजवादी, भाजप सर्व पक्षांचा समावेश असेल.”

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर शाब्दिक हल्लाबोल चढवला होता. ते म्हणाले, “भाजपची विचारधारा धार्मिक तेढ, जातीय तेढ आणि द्वेष निर्माण करण्याची आहे. त्यांची ही विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधून आली आहे.

आरएसएसमध्ये महिलांचा सन्मान होत नाही. तर भाजपकडे इतिहास सांगण्यासारखं काहीच नाही. मुघलांचं आणि इंग्रजांचं राज्य असताना या विचारसरणीची लोकं सत्ताधारी पक्षासोबत होती.

परंतु हातात सत्ता आल्यावर ही लोकं देशाची विभागणी करू पाहत आहे. म्हणून 2024 ची निवडणूक भारतीय जनता पक्षाची शेवटची निवडणूक असेल.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही