Sharad Pawar | कोण बच्चू कडू बाबा? शरद पवारांची कडूंवर खोचक टीका

Sharad Pawar | कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत केलेल्या विधानावर राज्याच्या राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत होत्या.

शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. काका-पुतणे महाराष्ट्राला वेड्यात काढत असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं होतं.

बच्चू कडू यांच्या या वक्तव्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलत असताना पवारांनी बच्चू कडूंवर टीकास्त्र चालवलं आहे.

Who Bacchu Kadu? – Sharad Pawar

बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत असताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “कोण बच्चू कडू? मी चारवेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो.

त्याचबरोबर मी एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे. मी केंद्रामध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडतो. तुम्ही उद्या मला कुण्या गल्लीबोळातल्या लोकांबाबत प्रतिक्रिया विचाराल.”

बच्चू कडू चार वेळा आमदार आहेत, असं पत्रकारांनी शरद पवारांना सांगितलं. ते चार वेळा आमदार आहेत, तर मी चार वेळा मुख्यमंत्री होतो, असं म्हणत शरद पवारांनी बच्चू कडूंवर निशाणा साधला.

दरम्यान, सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अजित पवारांबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. अजित पवार आमचेच नेते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फुट नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.

काल (25 ऑगस्ट) सकाळी पत्रकारांशी संवाद साधत असताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याला दुजोरा दिला होता.

मात्र, काल दुपारी पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना मी अजित पवारांबद्दल असं बोललोच नव्हतो, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्यावरून बच्चू कडू यांनी त्यांच्यावर टीका केली होती.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.