Devendra Fadnavis | मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जपान दौऱ्यावरून भारतात परतले आहे. भारतात येताच त्यांनी मुंबई विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलत असताना त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर खोचक टीका केली आहे. नाना पटोले यांना मी गांभीर्यानं घेत नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जपान दौऱ्यावर टीका केली होती. राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना नेते गावाला, जपानला जातात.
नाना पटोले यांच्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “नाना पटोले यांना मी कधीच गांभीर्याने घेत नाही. कारण मी जपानला फिरण्यासाठी गेलो नव्हतो.
जपानवरून मी भारतासाठी काहीतरी घेऊन आलो आहे. नाना पटोले सकाळी काही वेगळं बोलतात आणि संध्याकाळी काही वेगळं बोलतात.”
I was warmly welcomed in Japan – Devendra Fadnavis
यावेळी बोलत असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांच्या जपान दौऱ्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “जपानमध्ये माझं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं.
मला जपानच्या सरकारनं राज्य अतिथी म्हणून आमंत्रण दिलं होतं. जपान दौरा करून भारतात आल्यानंतर मला अत्यंत आनंद होत आहे. आपल्या मातृभूमीचे दर्शन घेऊन मला अतिशय प्रसन्न वाटत आहे.
जपानच्या अनेक कंपन्या त्यांच्या शिष्टमंडळासह भारतात येणार आहे. सोनी आणि इतर अनेक मोठ्या कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे.
कारण त्या कंपन्यांना भारताच्या क्षमतेवर विश्वास आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासूनच जपानसोबत चांगले संबंध ठेवले आहे, त्याचेच हे चांगले परिणाम आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Vijay Wadettiwar | अजित पवारांचा बंदोबस्त करण्यासाठी शरद पवार मैदानात उतरले – विजय वडेट्टीवार
- Vinayak Raut | अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठीच सत्तेत सामील झालेय – विनायक राऊत
- Sudhir Mungantiwar | भाजपमध्ये येणार नाही असं वडेट्टीवारांनी जाहीर करावं – सुधीर मुनगंटीवार
- Sharad Pawar | कोण बच्चू कडू बाबा? शरद पवारांची कडूंवर खोचक टीका
- Sanjay Raut | शरद पवार गनिमी काव्याने लढताय – संजय राऊत