Congress | काँग्रेस पक्ष फुटणारच; भाजप खासदाराचं मोठं वक्तव्य

Congress | टीम महाराष्ट्र देशा: 02 जुलै 2023 रोजी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. या दिवशी अजित पवार (Ajit Pawar) काही आमदारांसह शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले होते.

अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीनंतर काँग्रेस पक्ष फुटणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर (Ranjeetsingh Naik Nimbalkar) यांनी मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादीनंतर लवकरच काँग्रेस पक्ष फुटणार असल्याचं निंबाळकर यांनी म्हटलं आहे.

Congress MLAs and MPs are upset – Ranjeetsingh Naik Nimbalkar

प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना रणजीत सिंह नाईक निंबाळकर म्हणाले, “लोकसभा निवडणुकांसाठी अजून 08 ते 09 महिने बाकी आहे. त्यामुळे काँग्रेसचे (Congress) आमदार आणि खासदार अस्वस्थ झाले आहे.

या अस्वस्थ आमदार आणि खासदारांनी त्यांची अस्वस्थता मला खाजगीमध्ये बोलून दाखवली आहे. ते कधीही भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर काँग्रेसमध्ये देखील फूट पडणार आहे.

त्याचबरोबर शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानं भाजपशी हातमिळवणी केल्यानं देशाचं आणि राज्याचं कल्याण होऊ शकतं. शरद पवार (Sharad Pawar) सत्तेत सामील झाले तर नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे हात बळकट होऊ शकतात.”

यावेळी बोलत असताना रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकांवर देखील भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “येत्या 10 वर्षात केंद्रात आणि राज्यात भाजपचेच सरकार कायम राहणार आहे.

त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या 50 जागा नक्कीच वाढलेल्या दिसतील. आगामी निवडणुकांसाठी आमची जोरदार तयारी सुरू असून मी या निवडणुकांसाठी पूर्णपणे तयार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून जो आदेश येईल, त्याचं मी काटेकोरपणे पालन करणार आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.