Chitra Wagh | उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फक्त फक्त थयथयाट – चित्रा वाघ

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: काल (27 ऑगस्ट) हिंगोलीमध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा पार पडली.

या सभेमध्ये बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर खोचक टीका केली आहे. चांद्रयान चंद्रावरती उतरलं, याचं मी कौतुक करतो.

मात्र, काही लोक या मोहिमेचा गैरफायदा घेताना दिसत आहे. आता निवडणुका जवळ येत आहे. तर काही लोक म्हणतील की, 2030 पर्यंत मी तुम्हाला चंद्रावर घर देईल.

परंतु, तुम्ही यावर विश्वास ठेवू नका. चंद्र दूरच राहिला तुम्हाला तुमचं शेतातलं घर गहाण ठेवावं लागेल, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Uddhav Thackeray’s meeting is just a shambles – Chitra Wagh 

ट्विट करत चित्रा वाघ म्हणाल्या, “उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फक्त फक्त थयथयाट. उद्धव जी, तुम्हाला नेमका कशाचा राग आहे, तुम्ही जम्मू काश्मीरचं कलम ३७० हटवल्याचा राग आहे की अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहतंय याचा राग आहे.

आपली आता अर्थव्यवस्था मजबूत बनतेय याचा राग आहे की आपण चंद्रावर पोहोचलो याचा राग आहे. भारताची किर्ती जगभरात पोहोचलीय याचा राग आहे.

उद्धवजी आम्हाला माहितेय की, तुमचा राग पंतप्रधान मोदी जी यांच्यावर आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी रात्रं दिवस काम करताहेत. म्हणूनच तुमचा जळफळाट.. थयथयाट सुरू आहे.

उद्धवजी मी मागील वेळेस तुमच्या जळजळीवर बरनोल पाठवलं होतं पण आता कळतंय की त्याचा काही उपयोग नाही. कारण तुमची जळजळ ही मानसिक आहे. तुमचा पक्ष संपल्यापासून तुमचं मानसिक संतुलन बिघडलंय…. काळजी घ्या उद्धवजी.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.