Sanjay Raut | मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) गुजरात दौऱ्यावर आहे. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान पश्चिम क्षत्रिय परिषद बैठक पार पडणार आहे.
या बैठकीत अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील सामील होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे. गुजरातला जाणं अपराध आहे का? असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Is it a crime to go to Gujarat? – Sanjay Raut
आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “गुजरातला जाणं कोणता अपराध आहे का? गृहमंत्री अमित शाह यांचा तो बालेकिल्ला आहे.
अमित शाह एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे पॉलिटिकल बॉस आहे. एकेकाळी महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय गोष्टी ठरायच्या. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये हाय कमांड होतं.
महाराष्ट्र देशाला दिशा प्रदान करत होतं. मात्र, सध्याच्या नव्या सिस्टीममध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गुजरातला जातात. गुजरातची लोकं आमचे मित्र आहे.
परंतु, महाराष्ट्रामध्ये सध्या काही राहिलेलं नाही. राज्यातून सर्व बाहेर जाताना दिसत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपले निर्णय घेण्यासाठी गुजरातला जात आहे.”
दरम्यान, ठाकरे गटानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील धारेवर धरलं आहे. ठाकरे गटानं आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून अजित पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. “विकासासाठी आपण शिंद फडणवीस यांच्याबरोबर गेल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. हा दावा पोकळ आणि बिनबुडाचा आहे.
अजित पवार यांना विकासाची हौस आहे हे मान्य, पण गेली अनेक वर्षे सत्तेत असताना त्यांनी विकासाचे असे कोणते इमले रचले? बारामतीत जाऊन अजितदादा असेही म्हणाले की, “मला सत्तेची हाव नाही.
मी सत्तेसाठी हपापलेला कार्यकर्ता नाही शाहू, फुले, आंबेडकर अशा महान विभूतींचे विचार आपण पुढे नेणार आहोत” मुळात महाराष्ट्रासह देशात धार्मिक तणाव निर्माण करून दंगली घडविणे हा भाजपचा एककलमी कार्यक्रम आहे”, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Bacchu Kadu | सचिन तेंडुलकरला मोठा झटका! बच्चू कडू दोन दिवसात वकिलांमार्फत बजावणार नोटीस
- Ajit Pawar | अजित पवारांची विकासाची व्याख्या म्हणजे फसवणूक आणि लूट; ठाकरे गटाचा पवारांवर घणाघात
- Congress | काँग्रेस पक्ष फुटणारच; भाजप खासदाराचं मोठं वक्तव्य
- Devendra Fadnavis | नाना पटोलेंना मी गांभीर्याने घेत नाही – देवेंद्र फडणवीस
- Vijay Wadettiwar | अजित पवारांचा बंदोबस्त करण्यासाठी शरद पवार मैदानात उतरले – विजय वडेट्टीवार