Sambhajiraje Chhatrapati | मुंबई: गेल्या महिन्यात अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले. सत्तेत सामील होताच त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
त्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
अजित पवार मुख्यमंत्री होणार नाही, असा दावा संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
The three parties in power will not stay together in the future – Sambhajiraje Chhatrapati
संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) म्हणाले, “अजित पवार मुख्यमंत्री होणार एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद जाणार, असं अनेक लोक म्हणतात.
मात्र, अजित पवार मुख्यमंत्री होणार नाही, हे मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो. भारतीय जनता पक्ष ज्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा करत होता त्यांनाच ते आता सोबत घेऊन बसले आहे.
सध्या सत्तेत असलेले तिन्ही पक्ष भविष्यात एकत्र राहणार नाही. कारण हे तिन्ही पक्ष फक्त लोकसभेसाठी एकत्र आले आहे. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर अजित पवार पुन्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत जातील.”
यावेळी बोलत असताना संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन भाजपनं दिलं होतं.
त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक उभारण्याचं देखील भाजपनं सांगितलं होतं. मात्र, त्या स्मारकाचं जलपूजन होऊन नऊ वर्ष उलटून गेली आहे. मात्र नरेंद्र मोदी सरकारनं अद्याप त्यावर काम सुरू केलेलं नाही. ते स्मारक अजून पर्यंत पूर्ण का झालेलं नाही?”
महत्वाच्या बातम्या
- Vijay Wadettiwar | अजित पवारांच्या सभेला लोकांची बसण्याची इच्छा नव्हती – विजय वडेट्टीवार
- Chitra Wagh | उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फक्त फक्त थयथयाट – चित्रा वाघ
- Sanjay Raut | गुजरातला जाणं अपराध आहे का? संजय राऊतांची शिंदे-फडणवीसांवर खोचक टीका
- Bacchu Kadu | सचिन तेंडुलकरला मोठा झटका! बच्चू कडू दोन दिवसात वकिलांमार्फत बजावणार नोटीस
- Ajit Pawar | अजित पवारांची विकासाची व्याख्या म्हणजे फसवणूक आणि लूट; ठाकरे गटाचा पवारांवर घणाघात