Chitra Wagh | पवित्र भावना समजण्याइतकं तुमचं मन संवेदनशील नाही; चित्र वाघांची उद्धव ठाकरेंवर टीका

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काल (27 ऑगस्ट) हिंगोली शहरामध्ये जाहीर सभा पार पडली.

या सभेमध्ये बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टीका केली आहे. हिम्मत असेल तर यंदा मुस्लिम महिलांकडून राखी बांधून घ्या.

त्याचबरोबर हिंमत असेल तर बिल्कीस बानो आणि मणिपूरमध्ये दिंड काढलेल्या महिलांकडून राखी बांधून घ्या, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Narendra Modi tried to preserve his culture by tying Rakhi – Chitra Wagh

ट्विट करत चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, “रक्षाबंधनासारख्या पवित्र सणाला मोदीजींनी राखी बांधून घेत आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला.

तर त्यावरही तुम्ही हिणवण्याची भाषा केलीत, उद्धवजी यामागची पवित्र भावना समजण्याइतकेही आता तुमचे मन संवेदनशील राहिलेले नाही, हे दुर्दैव!

उद्या तुमच्याच पक्षातल्या आतापर्यंत तुम्हाला, तुमच्या मुलाला, पक्षाला इतकंच काय वंदनीय बाळासाहेबांनाही दुषणं देणाऱ्या निलमताई म्हणतात तस सटर-फटर ने तुम्हाला राखी बांधली, तर तेव्हा आम्ही काय म्हणायचं ?”

दरम्यान, या सभेमध्ये बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला होता.

उद्धव ठाकरे म्हणाले, “या सभेच्या माध्यमातून मला जनतेशी संवाद साधायचा आहे. त्यामुळे मी गद्दारांवर बोलण्यात वेळ घालवणार नाही. माझी सभा ही जनतेसाठी आहे, गद्दारांसाठी नाही.

ज्या गद्दारांची आपण नाग समजून पूजा केली ते उलट आपल्याला डसायला लागले आहे. शासन आपल्या दारी थापा मारत आहे. त्याचबरोबर सरकारने कांदा निर्यातीवरील शुल्क वाढवला आहे.

डबल आणि ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यांसाठी काय करत आहे? शासन आपल्या दारी आणि घोषणा फक्त कागदावरी अशी सध्याची परिस्थिती झाली आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.