Share

Praful Patel | राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह अजित पवारांनाच मिळणार – प्रफुल्ल पटेल

🕒 1 min readPraful Patel | बीड: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले. या घटनेनंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा ठोकला होता.Related News for Youअजितदादांच्या शोकसभेत जॅकलीनची अचानक एंट्री; ‘त्या’ व्हायरल व्हिडिओने … Read more

Published On: 

🕒 1 min read

Praful Patel | बीड: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे.

अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले. या घटनेनंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा ठोकला होता.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नाव आम्हालाच मिळणार असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.

The Election Commission will give the decision of the NCP party by September 30 – Praful Patel

काल (27 ऑगस्ट) बीड शहरामध्ये अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली. या सभेमध्ये बोलत असताना प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह कुणाकडं जाईल? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. त्यामुळं मी सर्वांना याबाबत ठामपणे सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय निवडणूक आयोग 30 सप्टेंबर पर्यंत देईल.

हा निर्णय अजित पवार यांच्याच बाजूनं लागणार आहे. याबाबतीत प्रत्येकजण वेगवेगळी भूमिका मांडून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नाव अजित पवार यांच्याकडं राहणार आहे.”

पुढे बोलताना ते (Praful Patel) म्हणाले, “सध्या राजकीय वर्तुळामध्ये प्रत्येकजण आपापली भूमिका मांडताना दिसत आहे. तरी आम्ही विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे.

काही लोक म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फुट नाही आणि ते खरं आहे. म्हणून सर्वांनी या निर्णयाचं समर्थन करायला हवं. राजकारणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी घडत असतात.

मात्र, प्रत्येक परिस्थितीत आपल्याला योग्य निर्णय घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. आम्ही हा निर्णय लोकशाही पद्धतीनं घेतलेला आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!