Nitesh Rane | नितीन देसाईंना मातोश्रीच्या जवळचा माणूस धमक्या देत होता – नितेश राणे

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: एनडी स्टुडिओचे मालक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. या प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करत आहे.

आर्थिक बाबींमुळे नितीन देसाई यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. नितीन देसाईंना मातोश्रीच्या जवळचा माणूस धमक्या देत होता, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

Uddhav Thackeray had his eye on Nitin Desai’s studio – Nitesh Rane

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “नितीन देसाई आत्महत्या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांचा समावेश आहे, याचे पुरावे मी देणार आहे.

नितीन देसाई जेव्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भेटायला गेले होते, तेव्हा ठाकरे देसाईंना भेटले नव्हते. कारण उद्धव ठाकरेंची नजर नितीन देसाई यांच्या स्टुडिओवर होती. मातोश्रींचा जवळचा माणूस नितीन देसाई यांना धमक्या देत होता.”

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गुजरात दौऱ्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ते म्हणाले, “संजय राजाराम राऊत यांचा मालक (उद्धव ठाकरे) गुजराती व्यापाऱ्याकडून पैसे घेऊन परदेशी दौऱ्यावर जातो. त्यांनी यासाठी कोणत्या गुजराती व्यापाऱ्याकडून पैसे घेतले, हे त्यांनी जाहीर करावं, नाहीतर मी हे जाहीर करतो.

त्याचबरोबर मुंबईमध्ये इंडिया आघाडीची होणारी बैठक कोणत्या गुजराती व्यापाऱ्यांनं आयोजित केली आहे, हे देखील त्यांनी सांगावं. संजय राऊत यांना भारताचा आणि देशाचा एवढा पुळका आला असेल, तर त्यांनी इंडिया आघाडीची बैठक सुरू होण्यापूर्वी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख नेत्यांना भारत मातेची पूजा करायला सांगावी.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.