Ajit Pawar | मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष; अजित पवार स्पष्टच बोलले

Ajit Pawar | पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गटानं राष्ट्रवादीच्या नावावर आणि चिन्हावर दावा ठोकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद, नाव आणि चिन्ह आमच्याकडेच येईल अशी भूमिका अजित पवार गटानं घेतली आहे.

याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मीच राष्ट्रवादीचा अध्यक्ष असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

The Election Commission will decide in our favor – Sunil Tatkare

“अजित पवार (Ajit Pawar) आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे, असं आम्ही निवडणूक आयोगाला याचिकेद्वारे सांगितलं आहे. निवडणूक आयोग आमच्या बाजूनं निर्णय देईल असा आमचा ठाम विश्वास आहे”, असं अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी म्हटलं होतं.

सुनील तटकरे यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत असताना अजित पवार म्हणाले, “मला माझ्या सहकाऱ्यांनी केलं आहे. त्यामुळं मी आहे.” अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, या चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी देखील मोठा दावा केला आहे.

ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नाव कोणाला मिळेल? याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय निवडणूक आयोग 30 सप्टेंबर पर्यंत देईल.

हा निर्णय अजित पवार यांच्याच बाजूनं लागणार आहे आणि हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. राष्ट्रवादीचे चिन्ह आणि नाव अजित पवार यांच्याकडंच राहणार आहे.

राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये प्रत्येकजण आपली भूमिका मांडत असतो. त्याचप्रमाणे आम्ही देखील विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीमध्ये फुट नाही असं काही लोक म्हणतात आणि ते खरं आहे. म्हणून सर्वांनी या निर्णयाचं समर्थन करायला हवं.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.