Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काल (27 ऑगस्ट) हिंगोलीमध्ये जाहीर सभा पार पडली.
या सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा दाढीवाला असा उल्लेख केला होता.
याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे हल्ली रामदास आठवले यांची कॉपी करू लागले आहे, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
Uddhav Thackeray’s meeting was a time pass meeting – Sanjay Shirsat
उद्धव ठाकरे यांच्या सभेबद्दल प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “उद्धव ठाकरे यांची कालची सभा टाईमपास सभा होती. लोकांनी त्यांची सभा एन्जॉय केली आहे.
लोकांना आता उद्धव ठाकरे यांच्या टोमण्यांचा कंटाळा आला आहे. आजकाल उद्धव ठाकरे रामदास आठवले यांची कॉपी करायला लागले आहे. यमक जुळवायला लागले आहे.
शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी साधारण 50 हजार लोक एकत्र येतात. या कार्यक्रमातून तुम्हाला काय मिळालं? हा प्रश्न तिथे येणाऱ्या त्या लोकांना विचारा. गरिबाला मिळणाऱ्या मदतीची उद्धव ठाकरे चेष्टा करायला लागले आहे.”
माझ्या नादी लागला तर तुमच्या अंगावर कपडे राहणार नाही, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर देखील संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, “संजय राऊत यांच्या नादी कोणी लागत नाही. संजय राऊत स्वतः उघडा बसलेला आहे. त्याच्या नादी आम्ही का लागावं? संजय राऊत यांच्या फाटक्या तोंडाला महाराष्ट्र वैतागला आहे. संजय राऊत काउंट करण्यासारखे नाही. त्यांना बॉयकॉट काय करायचं?”
“वज्रमुठ सभांमध्ये कधी शरद पवार दिसत नाही. तुम्ही राष्ट्रीय नेते आहात ना? तर तुमच्याबरोबर एखादा राष्ट्रीय नेता नको का? अजित पवार, छगन भुजबळ, नाना पटोले अभिनेते वज्रमुठ सभांना उपस्थित राहायचे.
त्यावेळी त्यांनी आपण कोणत्या स्टेजवर आहोत? हे बघायला हवं होतं. इतरांवर टीका करण्याआधी त्यांनी आपली लायकी कोणत्या थरावर आहे? हे पाहायला हवं”, असही ते (Sanjay Shirsat) यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष; अजित पवार स्पष्टच बोलले
- Vijay Wadettiwar | शरद पवार भाजपसोबत आल्याशिवाय अजित दादांना मुख्यमंत्रीपद नाही – विजय वडेट्टीवार
- Chitra Wagh | पवित्र भावना समजण्याइतकं तुमचं मन संवेदनशील नाही; चित्र वाघांची उद्धव ठाकरेंवर टीका
- Praful Patel | राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह अजित पवारांनाच मिळणार – प्रफुल्ल पटेल
- Nitesh Rane | नितीन देसाईंना मातोश्रीच्या जवळचा माणूस धमक्या देत होता – नितेश राणे