Ashish Shelar | सार्वजनिक रडण्याचा ‘रुदाली’चा कार्यक्रम म्हणजे उद्धव ठाकरेंचं भाषण – आशिष शेलार

Ashish Shelar | मुंबई: काल हिंगोली शहरामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा पार पडली. या सभेमध्ये बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर खोचक टीका केली आहे.

त्यांच्या या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सार्वजनिक रडण्याचा ‘रुदाली’चा कार्यक्रम म्हणजे उद्धव ठाकरे यांचं भाषण आहे, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या सभेवर प्रतिक्रिया देताना आशिष शेलर (Ashish Shelar) म्हणाले, “पूर्वीच्या काळी एखाद्या गावामध्ये दुःख, मृत्यू यासारखे प्रसंग घडल्यानंतर काही महिला एकत्र येऊन रडण्याचा कार्यक्रम करायच्या, त्या कार्यक्रमांप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या सभा होताना दिसत आहे.

रडके गावकरी म्हणजे उद्धव ठाकरेंची सभा. त्यावेळी त्या महिला रडायचा जो कार्यक्रम करायच्या तो आजच्या काळात उद्धव ठाकरे यांचं भाषण आहे.

Uddhav Thackeray does not have his own speech, thoughts and policies – Ashish Shelar

पुढे बोलताना ते (Ashish Shelar) म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्याकडं स्वतःचं भाषण, विचार आणि धोरण नाही. फक्त दुसऱ्यांच्या घरात डोकवनं, दुसऱ्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं, दुसऱ्यांच्या कार्यक्रमावर थैयथैयाट करणं या सर्व गोष्टींमुळे उद्धव ठाकरे स्वतःचे कार्यक्रम खराब करून घेत आहे.

भारतीय जनता पक्ष कधीच आपली पातळी सोडून बोलत नाही. उद्धव ठाकरे यांनी आपली पातळी बघून बोलायला पाहिजे, असं आम्ही त्यांना नम्रपणे सांगत आहोत.”

“भाजपचा प्रामाणिकपणा हा त्यांचा दुबळेपणा नव्हे. उद्धव ठाकरे यांचे अर्धे नगरसेवक पळून गेले आहे. त्याचबरोबर त्यांचे अर्धे आमदार देखील त्यांना सोडून गेले आहे.

उद्धव ठाकरे यांची अवस्था शोलेमधील असरानी सारखी झाली आहे. आधे इधर आधे उधर और में कड़क जेलर. आम्हाला देखील तुम्हाला घरबश्या म्हणायचं नाही, तात्या विंचू म्हणायचं नाही आणि असं आम्ही तुम्हाला म्हणणार नाही.

आमची तशी प्रथा परंपरा नाही. तुमच्या अहंकारानं तुमच्या पक्षाचं स्थान ठरवलं जात आहे”, असही ते (Ashish Shelar) यावेळी म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.