Sanjay Raut | राम मंदिराच्या उद्घाटनावेळी हल्लाची भीती – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: येत्या काही महिन्यांमध्ये राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या उद्घाटनासाठी हजारो भाविक उपस्थित राहणार आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. राम मंदिराच्या उद्घाटनावेळी हल्ला घडण्याची भीती संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

देशातील कानाकोपऱ्यातून अयोध्येमध्ये ट्रेन बोलून एखाद्या दुसऱ्या ट्रेनवर एखादा हल्ला घडू शकतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाच्या वेळी देशातील कानाकोपऱ्यातून अयोध्येमध्ये ट्रेन बोलावून एखाद्या दुसऱ्या ट्रेनवर पुलवामाप्रमाणे हल्ला घडू शकतो. पुलवामा हल्ला घडवला जाऊ शकतो, असं म्हटलं जातं.

तर अयोध्येमध्ये देखील हल्ला घडवला जाऊ शकतो, अशी भीती या देशातील अनेक प्रमुख पक्षांना वाटत आहे. इंडियाच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा होणार आहे. त्यामुळं आम्ही अत्यंत सावध आहोत.”

The case of Babri and Ayodhya is over – Sanjay Raut

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “बाबरी आणि अयोध्येचं प्रकरण संपलेलं आहे. कोणी जर हे प्रकरण काढत असेल तर ते मूर्ख आहे आणि ते लोकांना देखील मूर्ख बनवत आहे.

बाबरी आणि अयोध्येचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयानं संपवला आहे. त्या ठिकाणी राम मंदिर उभं राहत आहे. या गोष्टीचं श्रेय कोणी घेऊ नये. त्या गोष्टीचं श्रेय कुणाला द्यायचं असेल तर ते कारसेवकांना द्यायला हवं. यामध्ये शिवसेनेचा देखील सहभाग आहे.”

यावेळी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी इंडियाच्या बैठकीबाबत देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मुंबईमध्ये विरोधकांच्या इंडिया आघाडीची खूप महत्त्वाची बैठक होणार आहे.

मुंबईमध्ये आमचं सरकार नाही तरीही आम्ही या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलं आहे. आपलं सरकार पक्ष फोडण्याचं काम करत आहे. त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला फोडलं आहे.

पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होत आहे. त्याचबरोबर विरोधकांच्या या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.