Pankaja Munde | 2 महिन्याच्या ब्रेकनंतर पंकजा मुंडे राजकारणात सक्रिय, राज्यात करणार शिवशक्ती दौरा

Pankaja Munde | बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे या दोन महिन्याच्या राजकीय ब्रेकवर होत्या. सध्याच्या राजकारणाचा कंटाळा आल्यामुळे त्यांनी दोन महिन्याचा राजकीय ब्रेक घोषित केला होता.

त्यांचा हा ब्रेक संपलेला असून पंकजा मुंडे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होताना दिसत आहे. येत्या महिन्यात पंकजा मुंडे यांच्याकडून शिवशक्ती यात्रा काढली जाणार आहे. या यात्रेदरम्यान त्या राज्यातील विविध ठिकाणी देवदर्शनासाठी जाणार आहे.

This tour will be for Devdarshan – Pankaja Munde

दोन महिन्याच्या ब्रेकनंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) पुढच्या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील दहापेक्षा अधिक जिल्ह्यात दौरे करणार आहे.

हा दौरा देवदर्शनासाठी असेल, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात वेरूळच्या घृष्णेश्वराच्या दर्शनानं होणार आहे.

त्यानंतर त्या पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जाणार आहे. श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंचा हा दौरा असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा हा दौरा फक्त देवदर्शनापुरता मर्यादित राहणार नसल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

या दौऱ्यादरम्यान त्या राजकीय कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन चर्चा करतील, अशी शक्यता राज्याच्या राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

या दौऱ्यादरम्यान पंकजा मुंडे राज्यातील 10 पेक्षा अधिक जिल्ह्यांना भेट देणार आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांचा साधारण पाच हजार किलोमीटरचा प्रवास होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.