Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे.
राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी देशाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येमध्ये ट्रेन बोलून एखाद्या दुसऱ्या ट्रेनवर हल्ला घडवून आणला जाऊ शकतो, असं संजय राऊत यांनी म्हटल आहे.
संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
Sanjay Raut is an idiot – Sanjay Shirsat
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “संजय राऊत मूर्ख आहे. हा राजकारणाचा अत्यंत किळसवाणा प्रकार आहे.
राम मंदिराचं जेव्हा उद्घाटन होईल तेव्हा प्रत्येक भाविक आनंदानं त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असेल. राम मंदिराचं संरक्षण करणं, ही सरकारची जबाबदारी राहणार आहे.
आम्हाला काय पाहिजे आहे, हे प्रत्येकजण प्रभू श्रीरामांना दर्शन घेऊन सांगणार आहे. बॉम्ब ठेवणार आहे, हल्ले होणार आहे, असं म्हणणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल व्हायला हवे. यासाठी मी आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडं मागणी करणार आहे.”
दरम्यान, आज सकाळी माध्यमांशी बातचीत करत असताना संजय राऊत यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
ते म्हणाले, “राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येणार आहे. या कार्यक्रमासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येमध्ये ट्रेन बोलवून एखाद्या दुसऱ्या ट्रेनवर पुलवामाप्रमाणे हल्ला घडवून आणला जाऊ शकतो.
पुलवामामध्ये हल्ला घडवून आणला होता, असं अनेक लोक म्हणतात. त्याचप्रमाणे अयोध्येमध्ये देखील हल्ला घडवून आणला जाऊ शकतो, अशी भीती देशातील प्रमुख पक्षांना वाटत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Jayant Patil | ‘शासन आपल्या दारी’ म्हणतं ‘दुष्काळ आपल्या दारी’ येऊन ठेपलाय; जयंत पाटलांनी राज्य सरकारचे कान टोचले
- Keshav Upadhye | शिल्लक सेनेचा हताश प्रवक्ता; केशव उपाध्येंची संजय राऊतांवर खोचक टीका
- Ashish Shelar | ठाकरे गटाची लगबग म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमातील ‘ते’ दृश्य; इंडियाच्या बैठकीवरून शेलारांनी ठाकरेंना डिवचलं
- Pankaja Munde | 2 महिन्याच्या ब्रेकनंतर पंकजा मुंडे राजकारणात सक्रिय, राज्यात करणार शिवशक्ती दौरा
- Supriya Sule | गृहखात्याचा वचक कुठेही दिसत नाहीये; सुप्रिया सुळेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका