Jayant Patil | ‘शासन आपल्या दारी’ म्हणतं ‘दुष्काळ आपल्या दारी’ येऊन ठेपलाय; जयंत पाटलांनी राज्य सरकारचे कान टोचले

Jayant Patil | टीम महाराष्ट्र देशा: ऑगस्ट महिना संपत आला असला तरी राज्यामध्ये अनेक ठिकाणी पुरेसा पाऊस पडलेला नाही. यामुळं राज्यात बहुतांश ठिकाणी दुष्काळाचं संकट ओढवलं आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारला ‘दुष्काळ आपल्या दारी’ येऊन ठेपलाय याची पुसटशी तरी जाणीव आहे का?, असं म्हणतं जयंत पाटील यांनी राज्य शासनाला धारेवर धरलं आहे.

There has been 45 percent less rain than the average – Jayant Patil

ट्विट करत जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, “सद्य:स्थितीत ३२९ महसुली मंडळात पावसाचा २३ दिवसांचा खंड पडल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. कोकण वगळता राज्यातील १८ जिल्ह्यातील खरीप वाया गेला आहे.

सर्वात कमी पावसाची नोंद सांगली जिल्ह्यात झाली आहे. सरासरीपेक्षा ४५ टक्के कमी पाऊस झाला आहे. राज्यातील बऱ्याचशा भागात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे.

खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. पिके जळून गेली आहेत. कोरडवाहू, जिरायती शेतीतील जवळपास ७० टक्के पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यात जमा झाली आहेत.

शेतकऱ्यांनी शेतीत पेरणी, बियाणे-रासायनिक खते, औषधे यावर केलेल्या गुंतवणूकीचा परतावा परत मिळेल का ही चिंता आहे.

खरिपातील बहुतांश पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे चाऱ्याचे फारसे उत्पादन झालेले नाही. जनावरांच्या चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पशुधन वाचवण्याची देखील मोठी चिंता निर्माण झाली आहे.

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारला ‘दुष्काळ आपल्या दारी’ येऊन ठेपलाय याची पुसटशी तरी जाणीव आहे का?”

दरम्यान, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, आणि विदर्भामध्ये ऑगस्ट महिन्यात पुरेसा पाऊस पडलेला नाही. पुरेसा पाऊस न पडल्यामुळे राज्यातील 15 जिल्ह्यांवर दुष्काळाचं संकट ओढावलं आहे.

अशा परिस्थितीत येत्या काळात चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र सरकारनं शक्यतांवर अवलंबून न राहता संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्वरित उपाययोजना करायला हव्या.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.