Ajit Pawar | अजित दादांची ताकद वाढणार! अजित पवारांच्या लहान चिरंजीवांची राजकारणात एंट्री

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर दोन्ही गटांनी पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. अशात अजित पवार यांच्या ताकतीत वाढ होणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे.

कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लहान चिरंजीव जय पवार (Jay Pawar) राजकारणात सक्रिय होणार असल्याची माहिती मिळाली आहे. याबद्दल जय पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत संकेत दिले आहे.

दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांची बारामती शहरामध्ये सभा पार पडली. त्यांच्या या सभेनंतर जय पवार यांनी राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयाला भेट दिली आहे. या भेटीनंतर जय पवार राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहे.

I am ready to be active in politics – Jay Pawar

राजकारणात सक्रिय होण्यासाठी आपण तयार आहोत असं म्हणत जय पवार यांनी कार्यकर्त्यांना ग्रीन सिग्नल दिला असल्याची माहिती मिळाली आहे.

पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यानंतर जय पवार लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होताना दिसणार आहे. जय पवार राजकारणात सक्रिय झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या ताकतीत वाढ होणार आहे. तर शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या चिंतेत भर पडणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटावर खोचक टीका केली होती. अशात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली असल्याची माहिती मिळाली आहे.

अनिल देशमुख यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली आहे. सकाळी साडेनऊ वाजता देशमुख ठाकरे यांच्या भेटीस गेले होते.

त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.