Rohit Pawar | मुंबई: अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसले आहे.
अशात राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते रोहित पवार यांनी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना धारेवर धरलं आहे.
आपल्यावर कारवाई होईल हे लक्षात येताच छगन भुजबळ भाजप सोबत गेले, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
After joining the BJP, Bhujbal is speaking against Sharad Pawar – Rohit Pawar
रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना छगन भुजबळ भाजपवर टीका करायचे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये अडीच वर्ष काम केलं.
मात्र, जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पद मिळणार नाही उलट आपल्यावर कारवाई होईल, तेव्हा त्यांनी भाजपसोबत जाणं पसंत केलं.
भाजपसोबत गेल्यावर ते शरद पवारांविरुद्ध बोलताना दिसत आहे. जेव्हा ते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते तेव्हा त्यांना या सर्व गोष्टी का नाही सुचल्या?”
पुढे बोलताना ते (Rohit Pawar) म्हणाले, “भारतीय जनता पक्षाचा ओबीसी समाजाची जनगणना आणि राजकीय आरक्षणाला विरोध आहे, असं भुजबळ म्हणायचे.
मात्र आता ते स्वतः भाजपसोबत गेले आहे. सत्तेत सामील झाल्यानंतर ते ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर काम करत आहे का? ते ओबीसींच्या प्रश्नाबाबत फॉलोअप घेत आहे का?
सत्तेच्या हव्यासापोटी छगन भुजबळ यांनी त्यांची भूमिका बदलली आहे. त्यामुळे लोक आता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Anil Deshmukh | राज्याच्या राजकारणात येणार नवा भूकंप? अनिल देशमुखांनी घेतली राज ठाकरेंची भेट
- Nitesh Rane | उद्धव ठाकरे आणि संजय राऊत पाकिस्तानी एजंट असल्याचा संशय – नितेश राणे
- Sanjay Shirsat | संजय राऊतांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे – संजय शिरसाट
- Jayant Patil | ‘शासन आपल्या दारी’ म्हणतं ‘दुष्काळ आपल्या दारी’ येऊन ठेपलाय; जयंत पाटलांनी राज्य सरकारचे कान टोचले
- Keshav Upadhye | शिल्लक सेनेचा हताश प्रवक्ता; केशव उपाध्येंची संजय राऊतांवर खोचक टीका