Uddhav Thackeray | शरद पवारांनंतर उद्धव ठाकरे जाणार जालना दौऱ्यावर, घेणार मराठा आंदोलकांची भेट

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मराठा आंदोलक उपोषण करत होते. त्यांच्या या उपोषणादरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात दिसून आले आहे. तर या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण देखील तापल्याचं दिसून आलं आहे. या घटनेनंतर संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी घटनास्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली.

तर त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) देखील या गावामध्ये जाऊन नागरिकांची भेट घेणार आहे. संभाजीराजे छत्रपती आणि शरद पवार यांच्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे देखील आज जालना जिल्ह्यात दाखल होणार आहे.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज संध्याकाळी जालना जिल्ह्यातील अंबड आणि अंतरवरली सराटी या गावांना भेट देणार आहे.

या गावात उद्धव ठाकरे मराठा कार्यकर्त्यांची भेट घेणार आहे. त्याचबरोबर काल झालेल्या लाठीमारामध्ये जखमी झालेल्या आंदोलकांना देखील उद्धव ठाकरे भेटणार आहे.

काल घडलेल्या घटनेनंतर मराठा समाजामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मराठा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे.

Injustice is being done to the Maratha community – Sambhajiraje Chhatrapati

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी आज अंतरवरली सराटी गावात जाऊन आंदोलकांची भेट घेतली आहे. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचा वंशज म्हणून मी या ठिकाणी आलो आहे. पहिल्यांदा छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं.

आज पुन्हा एकदा मराठा समाजावर अन्याय होताना दिसत आहे. त्यासाठी मी लढत आहे. मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आतापर्यंत अनेक मोर्चा निघाले आहेत. हे सर्व मोर्चे अत्यंत शांततेत झाले आहे.

मात्र कालच्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज झाला, गोळ्या झाडल्या गेल्या. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळं आम्ही सरकारचा निषेध करतो.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.