Share

Sambhajiraje Chhatrapati | मराठ्यांवर गोळी घालायच्या आधी ती माझ्यावर घाला – संभाजीराजे छत्रपती

Sambhajiraje Chhatrapati | टीम महाराष्ट्र देशा: जालना जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलनादरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.

या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं आहे. या प्रकरणानंतर संभाजी राजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या घटनेनंतर मी सरकारचा निषेध करत असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

Chhatrapati Shahu Maharaj had given reservation for the first time – Sambhajiraje Chhatrapati

संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचा वंशज म्हणून मी या ठिकाणी बोलत आहे. छत्रपती शाहू महाराज यांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं होतं.

बहुजनांना शाहू महाराजांनी 50 टक्के आरक्षण मिळवून दिलं होतं. आज पुन्हा एकदा मराठ्यांवर अन्याय होताना दिसत आहे. त्यासाठी मी लढत आहे. मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक मोर्चे निघाले आहे.

हे सर्व मोर्चे शांततेत पार पडले आहे. मात्र, कालच्या आंदोलनामध्ये गोळ्या झाडल्या गेल्या, लाठीचार्ज झाला. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. यासाठी आम्ही सरकारचा निषेध करतो.”

पुढे बोलताना ते (Sambhajiraje Chhatrapati) म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्य शासन सरकार चालवत आहे. तर दुसऱ्या बाजूला हेच सरकार आंदोलकांवर गोळ्या झाडताना दिसत आहे.

हे काय निजाम आणि मुघलांचं राज्य आहे का? आंदोलकांवर गोळ्या का झाडायच्या? हे सुराज्य आहे का? मराठ्यांवर जर गोळी घालायची असेल तर पहिली गोळी माझ्यावर घाला, हे मी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचा वंशज म्हणून सांगत आहे. गोळ्या घालणं चूक आहे का बरोबर? हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगावं.

“आजपर्यंत मी कधीच राजकारण केलं नाही. मी नेहमी समाजकारण केलं आहे. दिल्लीत आणि महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार आहे. आरक्षणासाठी आम्हाला आणखी किती दिवस लढा द्यावा लागणार आहे?

आंदोलकांवर गोळ्या घालायला ते काय पाकिस्तानी आहेत का? आंदोलन करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारधारेला धरून चालणारे आहे. समाजाला कधी न्याय मिळणार? याचं उत्तर सरकारनं आम्हाला द्यायला हवं”, असही ते (Sambhajiraje Chhatrapati) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati | टीम महाराष्ट्र देशा: जालना जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलनादरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now