Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे.
तर या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये जाळपोळ देखील करण्यात आली आहे. या सर्व घडामोडी सुरू असताना या प्रकरणावर आता विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जालना जिल्ह्यातील घटना गृह खात्याचं मोठं अपयश आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
Devendra Fadnavis should resign from the post of Home Minister – Vijay Wadettiwar
विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “जालना जिल्ह्यामध्ये घडलेल्या प्रकरणाची निपक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेला लाठी चार्ज हे गृह विभागाचं मोठं अपयश आहे.
त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. त्याचबरोबर सरकारने मराठा समाजाची माफी मागायला हवी. या घटनेचं खापर तुम्ही जर मराठा समाजावर फोडत असाल, तर हे मोठं दुर्दैव आहे.
मराठा समाजाचं हे आंदोलन शांततेच्या मार्गानं सुरू होतं. सध्याच्या सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायला जमत नाहीये. सरकार मराठा आरक्षण देऊ शकत नाही. सरकारला या गोष्टीची जाणीव झाल्यामुळे त्यांना हा लाठीचार्ज करावा लागला.
दरम्यान, जालना जिल्ह्यात घडलेल्या प्रकरणावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
ते म्हणाले, “जालन्यामध्ये आंदोलन सुरू असताना आंदोलकांवर लाठीचार्ज झाला. कुणाच्याही परवानगीशिवाय हे होऊ शकत नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करणार, असे बोलणारे अद्याप घटनास्थळी पोहोचलेले नाही.
कधी, कुठे, केव्हा आंदोलन होईल याची माहिती आधीच दिली जाते. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, तेव्हा मला आधीच ही माहिती मिळायची. त्यामुळे एक फुल आणि दोन हाफ यांना या आंदोलनाबद्दल माहित नव्हतं का?”
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | भाजपा म्हणजे भाड्याने जमवलेली पार्टी – उद्धव ठाकरे
- Uddhav Thackeray | शरद पवारांनंतर उद्धव ठाकरे जाणार जालना दौऱ्यावर, घेणार मराठा आंदोलकांची भेट
- Sambhajiraje Chhatrapati | मराठ्यांवर गोळी घालायच्या आधी ती माझ्यावर घाला – संभाजीराजे छत्रपती
- Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मराठा समाजातील आंदोलकांची मागणी
- Sanjay Raut | सरकारनं जालना जिल्ह्यात लाठी चार्ज घडवून आणला – संजय राऊत