Udayanraje Bhosale | इतर समाजाला न्याय, मग मराठा समाजाला न्याय का नाही? – उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale | जालना: जालना जिल्ह्यातील अंतरवरली सराटी या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होतं. या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे.

या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असताना भाजप खासदार उदयनराजे भोसले घटनास्थळी दाखल झाले आहे. यावेळी त्यांनी मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे.

उदयनराजे भोसले यांनी सांगितलं तर आम्ही आंदोलन मागं घेऊन घरी जाऊ, असं मनोज जरांगे यांनी उदयनराजे यांना सांगितलं आहे. यानंतर उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Maratha protesters should get reservation – Udayanraje Bhosale

उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) म्हणाले, “मी गुन्हे मागे घ्यायला लावतो. मात्र, त्यानंतर तुम्ही चर्चांसाठी तयार राहा. येत्या दोन दिवसांमध्ये मी याबाबत बैठका घेईल.

जालना जिल्ह्यात जो अनुचित प्रकार घडला आहे, त्या संबंधित कसून चौकशी केली जाईल. लाठी चार्ज करणाऱ्यांना तात्काळ निलंबित केलं जाईल. मराठा आंदोलकांना आरक्षण मिळायला हवं.

मराठा समाज सहन करत आहे, म्हणून मराठा समाजाला प्रतीक्षा करावी लागत आहे. मराठा समाजाकडं दुर्लक्ष केलं जात असल्याचं यावरून लक्षात येत आहे. इतर समाजाला न्याय, मात्र मराठा समाजाला न्याय का नाही?”

पुढे बोलताना ते (Udayanraje Bhosale) म्हणाले, “आपल्याला सर्वांना शांततेत आंदोलन करायचं आहे. आपण सर्व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पाईक आहोत, असं असून देखील मराठा समाजाला न्याय मिळत नसेल तर हे खूप मोठं दुर्दैव आहे.

प्रत्येक घटक हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळं येत्या एक-दोन दिवसांमध्ये मी या विषयावर चर्चा घडवून आणतो. आतापर्यंत एक-दोन नाही तर 57 महामोर्चे झालेले आहे. मात्र, कधीच कोणत्या मोर्चामध्ये असा अनुचित प्रकार घडला नाही.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.